आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

जोगेश्‍वरीच्या सौंदर्यात भर घालणार्‍या विकास कामांचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन

जोगेश्वरी - जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून ही कामे करण्यात आली आहेत.- पश्‍चिम द्रुतगती महामार्ग येथील इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या भिंतीलगत उभारण्यात आलेल्या ‘आय लव जोगेश्‍वरी’ सेल्फी पॉईंट व सुशोभित भिंत, शिवसेना शाखा क्रमांक.५२, गोकुळधाम शाखेचे नुतनीकरण, ग्रंथालय, योगा केंद्र, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राचे ही उदघाटन करण्यात आले.जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राच्या सौंदर्यात भर घालणारे अनेक सुनियोजित विकास कामे करण्यात आली आहे.या सौंदर्यात अधिक भर घालणार्‍या तीन कामांचे उदघाटन पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून ही कामे करण्यात आली आहेत.विविध विकासकामांच्या माध्यमातून वायकर यांनी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचा कायापालट या अगोदरच केला आहे.जनतेच्या मनातील जोगेश्‍वरीच्या विकासाला त्यांनी अधिक प्राधान्य दिले आहे. पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील ईस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या भिंतीलगत रविंद्र वायकर यांनी ‘आय लव जोगेश्‍वरी’ सेल्फी पॉईंट उभारला असून भिंतीवर आकर्षक भिंती चित्रेही काढली असून या ठिकाणावरुन जाणारे  व येणारे पादचारी, वाहनधारक तसेच पर्यटक यांच्यासाठी हा भाग आकर्षणाचे केंद्र बनला आहे.गोरेगाव (पूर्व) येथील गोकुळधाम येथील शाखा क्रमांक ५२ चे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले असून या ठिकाणी ग्रंथालय, योगा केंद्र, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रही उभारण्यात आले आहे.या सगळ्या वास्तु आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आल्या आहेत.या सर्व कामांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे खासदार व नेते गजानन किर्तीकर, दिंडोशी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच विभागप्रमुख सुनिल प्रभू, उप महापौर सुहास वाडकर, नगरसेवक बाळा नर, प्रविण शिंदे, विधानसभा संघटक विश्‍वनाथ सावंत, महिला संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, उपविभागप्रमुख जयवंत लाड, कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, बाळा साटम, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, शाखाप्रमुख मंदार मोरे, अमर मालवणकर, बाळा तावडे, संदिप गाढवे, युवोसेनेचे अमित पेडणेकर, ईस्माइल युसुफ महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.स्वाती व्हावळ आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: