आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

मधुमेही रोगीसाठी मोफत आरोग्य शिबीर

उरण- हयातूल इस्लाम गरीब नवाज चॅरिटेबल ट्रस्ट उरण यांच्या माध्यमातून द ब्रदरहूड मेडिकल ऐड ऍण्ड वेलफेअर फॉउंडेशन यांच्या सहकार्याने उरण मधील मस्जिद मोहल्ला, उरण पोलीस स्टेशन जवळ, उरण शहर येथे मधुमेही (डायबेटीस ) रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिरा अंतर्गत मधुमेही (डायबेटीस )रुग्णांचे HBA1C,लिव्हर प्रोफाइल, एलक्ट्रॉलयटीस, युरीनालायसिस, सी क्रीटीव्ह, इन्फेकशन पॅनल (3 H,VDRL, MALARIA )आदी तपासण्या मोफत करण्यात आले. खास मधुमेही रोगांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.100 हुन अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावेळी हयातूल इस्लाम गरीब नवाज चॅरिटेबल ट्रस्ट उरणचे हाफिज फहद, हाफिज अर्शद, शानू मुकादम, नईम करवेकर, इरफान शेख, गुलजार भाटकर तर द ब्रदरहूड मेडिकल ऐड ऍण्ड वेलफेअर फॉउंडेशनचे इम्रान गुजराथी, अब्दुल पठाण, हरून गिरनारी आदी पदाधिकारी सदस्यांनी आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र मढवी,सरचिटणीस संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते आयाझ फकिह यांनी भेट दिली. सदर आरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: