आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

डॉ नातू महाविद्यालयात कोव्हीड योध्यांचा सन्मान

मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयतील आऊटरिच सेंटर फॉर एक्स्टेंशन ऍक्टिव्हिटीजच्या वतीने कोव्हीडच्या काळात उल्लेखनिय काम केल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशासेविका, रुग्णवाहीका चालक प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर यांचा कोव्हीड योध्ये म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे सहसचिव श्री अजितशेठ साळवी, सचिव श्री मोहन चव्हाण , संचालक कृष्णाजी चव्हाण प्राचार्य डॉ विजयकुमार खोत उपस्थित होते. यावेळी डॉ निकिता शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोरोना लसीचे महत्व विषद केले. कोरोना काळात आऊटरिच सेंटर ने केलेल्या सामाजिक कार्याबद्धल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आऊटरिच सेंटरचे समन्वयक प्रा डॉ सुरेश सुतार यांनी केले सूत्रसंचालन प्रा विकास मेहेंदळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ राजश्री कदम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: