आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

माजी नगरसेवक आत्माराम हरी तांबे यांचे पुन्हा पाण्यासाठी उपोषणाचा इशारा

अंबरनाथ (अविनाश म्हात्रे ):-  अंबरनाथ पश्चिम येथे एक दिवसाआड पाणी येथे ते देखील अपुरा आणि कमी दाबाने येते यासाठी अंबरनाथ पश्चिम येथील अनेक नगरसेवक यांनी वेळोवेळी मजीप्रा अधिकाऱ्यांबरोबर पत्रव्यवहार,चर्चा,भेटीगाठी,आंदोलन,उपोषण केले आहे परंतु कुठल्याही प्रकारचे पाण्याचे योग्य नियोजन होताना दिसत नाही या पावसाळयात मुबलक पाणीसाठा आहे म्हणून येथील नागरिक आनंदित होते परंतु नुकताच पावसाळा संपून काही दिवस होत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचे योग्य नियोजन नसल्यामुळे पुन्हा नागरिकांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे, कमलाकर नगर, महात्मा फुलेनगर,जावसई,अंबरनाथ पश्चिम येथे काही दिवसापासून पाणी टंचाईमुळे झळ नागरिकांना सोसावी लागत आहे,काही वेळा ३-४ दिवसातून एक वेळ पाणी येते ते देखील कमी दाबाने आणि वेळेचे देखील नियम नाहीत.

  नेहमीच नागरिकांच्या समस्थ्यां लक्षात घेऊन त्यांना मदतीला धावणारे येथील माजी नगरसेवक आत्माराम हरी तांबे यांनी या परिसरातील नागरिकांना रोज पाणी मिळावे आणि  पाणी संकट दूर करण्यासाठी व महेंद्र नगर मधील वॉर्ड क्रमांक २ मध्ये विविध ठिकाणी नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी व व्यवस्थित पाण्याचे नियोजन व्हावे यासाठी १५ दिवसाची मुदत दिली आहे जर १५ दिवसानंतर सदर पाणी टंचाई आणि पाण्याचे व्यवस्थित नियोजन झाले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे तसे पत्र मजीप्रा अधिकारी श्री बसनगर याना दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: