आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

कणकवली तालुक्यातील शिवडावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीधर तुकाराम जाधव यांचे पूणे येथे आकस्मित निधन; रविवारी शोकाकूल वातावरणात पार्थिवावर अंतिम संस्कार!

आ. वा वृत्तसेवा. मुंबई -प्रतिनिधी- समाजाचे आपण काही देणे लागतो, समाजाचे दुःख हे आपले दुःख समजून जनसेवा करीत रहा, अशा शब्दात वेळोवेळी मार्गदर्शन करणारे भांडुप मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कणकवली तालुक्यातील शिवडावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीधर तुकाराम जाधव यांचे रविवारी मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास पुणे येथील खासगी रुग्णालयात आकस्मित निधन झाले .मृत्यूसमयी वर्षांचे ६८ होते .

त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी भांडुप स्मशानभूमीत नातेवाईक व मित्र परिवार, आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी दुपारी १२.१५  पर्यंत त्यांचे पार्थिव भांडुपच्या मयुरेश सृष्टी मधील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते .तेव्हा भांडुपसह पनवेल, वाशी, ठाणे, मुलुंड, येथील हजारो आप्तेष्ठ नातेवाईक, राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले.

   गणेश जाधव यांचे संपूर्ण कुटुंबीय प्रतिवर्षी प्रमाणे कणकवली तालुक्यातील शिवडाव गावी  श्री गणेश चतुर्थी निमित्त गावी आले होते .सात दिवसाच्या  विसर्जनानंतर  शनिवारी ते कोल्हापूर मार्गे मुंबईकडे येण्यासाठी निघाले होते. पुणे येथे येताच त्यांना श्वास घेताना त्रास जाणवू लागला. त्याचक्षणी गणेश जाधव यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे ठरविले.गणेश जाधव यांनी शेवटच्या टप्प्यात सर्वतोपरी मदत करण्यासाठी खुप प्रयत्न केले. मात्र,डॉक्टर्स व रुग्णवाहिका सेवा वेळेत उपलब्ध न झाल्याने पूणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. 

   शनिवारी त्यांना कणकवली येथील रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले जात होते. त्यांनी मुंबईत निघून मुंबईत उपचार करूया,असे त्यांनी गणेश यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी मुंबईत जाण्याचे निश्चित केले होते. यापूर्वी,  मुलुंडच्या किमया किडनी केअर येथील डायलिसिस सेंटर मध्ये डॉक्टर निखिल केडीया ( MD Nephrologist) यांच्या निरक्षिकतेखाली डायलेसिसचे उपचार सुरू होते.

    त्यांच्या दुःखद निधनाची बातमी शिवडाव मध्ये समजताच मा.जि.प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांनी दुःख व्यक्त भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पत्नी ,तिन विवाहित मुलगे, गणेश, मंगेश, योगेश, सूना, व नातवंडे असा मोठा परिवार आहे.भांडुप मध्ये दुःखद बातमी कळताच रविवारी व सोमवारी सायंकाळपर्यंत अनेकांनी जाधव कुटुंबांची भेट घेऊन  सांन्तवन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: