आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जांभूळ पाडा येथे झालेल्या कातकरी आदिवासी समाजाच्या बैठकित अनेक महत्त्वाचे निर्णय

उरण -शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे , तहसील कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण आणि उरण सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या मोहीमे अंतर्गत 300 जातीचे दाखले , 500 नवीन रेशन कार्ड, 1000 रेशन कार्ड अद्ययावत करणे, 500 बँक पास बुक, 200 मतदानाचे कार्ड काढण्यात आले आहेत. तरी उर्वरित 2000 जातीचे दाखले, नवीन रेशन कार्ड वर धान्य आणि घरपट्टी तातडीने मिळण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे  आणि गट विकास अधिकारी निलम गाडे मॅडम यांना विनंती अर्ज करण्याचे  उरण सामाजिक संस्थेच्या आयोजित जाभूळपाडा येथील आदिवासी बांधवांच्या बैठकीत ठरले.यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रत्येक वाडी वरील सुशिक्षित दोन पुरुष आणि दोन महिला प्रतिनिधी यांना संघटित करून भविष्यात सर्व जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या हेतूने, चिरनेर जंगल सत्याग्रहात विरमरण आलेल्या  नाग्या महादू कातकरी यांच्या नावाने उरण तालुक्यातील पहिली सामाजिक  संस्था बनविण्याचे सर्वानुमते ठरले, जी संस्था भविष्यात सर्व आदिवासी बांधवांना एक आधार असेल.आधार कार्ड , बँक पास बुक, मतदानाचे कार्ड, पॅन कार्ड, गॅस कनेक्शन, जातीचे दाखले तयार करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यातील कातकरी बांधवानकडेच निश्चित केली.शासनाकडून ग्रामपंचायत ला मिळणारा 15% निधी, घरकुल योजनेचे लाभार्थी, 14-15 वित्त आयोगाने मंजूर केलेला निधी, वन हक्क दावे दाखल करण्यासाठी वन हक्क समिती गठित करणे इत्यादी संदर्भात माहिती अधिकार अंतर्गत सर्व आदिवासी वाड्या असलेल्या ग्रामपंचायतीन कडून मागील पाच वर्षाचा लेखा जोखा मागविन्याचे ठरले

   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या सहकार्यामुळेच आदिवासी बांधवांचे 300 जातीचे दाखले तयार करू शकलो. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या कडून अनेक योजना राबविल्या जातात परंतु  सदर विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या काही योजनांचा लाभ हा उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांना मिळत नाही. त्या  योजनांचा लाभ  मिळण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अहेरराव मॅडम यांच्या सोबत चर्चा करण्याचे ठरले.लवकरच डाउर नगरवाडी, पीर वाडी, भवरावाडी, बेलवाडी सारडे, पूणाडे वाडी, कोप्रोलि वाडी वरील प्रतिनिधींची अजून एक बैठक निश्चित करण्यात आली तहसीलदार भाऊसाहेब अंधारे , नायब तहसीलदार नरेश पेडवी यांचा आदिवासी समाजाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोणामुळे आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या सर्व स्टाफ ने केलेल्या मदतीमुळे हे अशक्य असे काम शक्य झाले आहे आणि भविष्यात देखील होत राहील असे मत प्रा. राजेंद्र मढवी यांनी मांडले.

    नामदेव ठाकूर यांनी सर्वांचे उपस्थित राहिल्या बद्दल आभार मानले आणि गेले दोन वर्ष आदिवासी बांधवांचे आवश्यक कागदपत्रे बनवण्याची चालू असलेल्या मोहीमे साठी प्रा.राजेंद्र मढवी सर यांनी कोणाचाही एक रुपया देखील न घेता स्वखर्चाने हे काम करत आहेत हे नमूद केले.सदर बैठकीस उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र मढवी सर, वेश्र्वी ग्राम पंचायत सरपंच  संदीप कातकरी, रायगड भूषण दत्ता गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, चिरले ग्राम पंचायत माजी सरपंच विश्रांती म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.बैठकीस वेश्र्वी वाडी वरील किरण कातकरी, जांभूळ पाडा वाडी वरील सुनील नाईक, दशरथ कातकरी, विंधने वाडी वरील आशीर्वाद कातकरी, दीपक कातकरी (सदस्य) , विष्णू कातकरी, सचिन कातकरी तसेच लिंबाची वाडी वरून मनीष कातकरी आणि कोल्हापूर वाडी वरून रवी कातकरी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: