आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी कुस्ती खेळाडूंची निवड व मार्गदर्शकाची नियुक्ती यासाठी सूचना जाहीर

अलिबाग :- जिल्हयातील कुस्ती मार्गदर्शकाच्या नियुक्तीसाठी दि.30 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 01.00 वा. जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली संगम, ता.अलिबाग येथे निवड चाचणी होणार आहे.  तसेच कुस्ती खेळाडूंच्या निवड चाचणी करिता बुधवार, दि.29 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.00 वा.कै.भाऊसाहेब कुस्ती संकुल, खोपोली ता. खालापूर, या ठिकाणी कुस्ती खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राकरिता निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. 

       कुस्ती खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राकरिता निवड चाचणीसाठी वयोमर्यादा 8 ते 12 वर्षे (मुले,मुली) असून खेळाडूंनी चाचणीला येताना संपूर्ण कुस्ती किट सोबत आणणे आवश्यक आहे. 

        प्रशिक्षक नियुक्ती निवड चाचणीकरिता वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे असून यामध्ये अति उच्च कामगिरी / गुणवत्ता असल्यासच समितीच्या मान्यतेने 50 वर्ष पर्यंत उमेदवारांना संधी देण्यात येईल. ऑलिंपिक / एशियन गेम्स/ जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग / पदक प्राप्त व प्रशिक्षण, जागतिक करंडक स्पर्धा / एशियन चॅम्पियनशिप / साऊथ एशियन स्पर्धा / संबधित खेळातील अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग / पदक प्राप्त खेळाडू प्रशिक्षण, राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारार्थी – प्रशिक्षण, एनआयएस पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत स्तरावरील कोर्सेस किंवा बीपीएड, एमपीएड सह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय खेळातील पदक प्राप्त प्रशिक्षणाच्या अनुभवासह तसेच राज्यस्तर खेळाडू, बीपीएड, एमपीएड सह कमीत कमी 10 वर्षे प्रशिक्षणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

       दिलेल्या मुदतीत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही. तरी याबाबत सर्व मुख्याध्यापक/प्राचार्य, माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी शासनाने दिलेल्या कोविड-19 च्या नियमांचे पालन करण्याबाबतही सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. 

तसेच अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक श्री. संदिप वांजळे, मो. क्र. 9850954237 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती अंकिता मयेकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: