आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ मे, २०२१

द्वारकानाथ सुर्यराव सेवानिवृत्त

मुंबई  : जेष्ठ समाजसेवक आणि देशमुख समाजाचे आधारवड श्री. व्दारकानाथ चंद्रकांतराव सुर्यराव (देशमुख) दिनांक ३१ मे २०२१ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग ठाणे येथे त्यांनी अविरतपणे ३९ वर्ष निष्ठेने आणि निस्वार्थीपणे  सेवा बजावली. आपल्या सेवेच्या कालावधित सहकारी आणि व्यवस्थापन यांचेशी चांगले संबंध दृढ ठेऊन  कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर विश्वास अधिक वृंध्दीगत व्हावा याद्रुष्टीने सतत प्रयत्नशील राहीले. साहजिकच त्यांनी बजावलेल्या उत्कृष्ट सेवेप्रित्यर्थ प्राधिकरणाच्या प्रत्येक विभागातून त्यांना सन्माने आदरपूर्वक सन्मानीत करून गौरविण्यात आले व त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा व आशिर्वाद देण्यात आले.
      आपले कुटुंब व नोकरी  प्रामाणिकपणे सांभाळून त्यांनी समाजाप्रतीही विविध स्तरावर निशंकपणे आपले खूप मोठे योगदान दिले. प्राधिकरणाच्या सेवेत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेत तब्बल २१ वर्षे संचालक म्हणून सांभाळलेली जबाबदारी वाखाणण्यासारखी ठरली. अगदि  शिस्तीने आणि निस्वार्थीपणे त्यांनी बजावलेल्या या सेवेदरम्यान पतपेढीच्या सदस्यांना  त्यांच्या आर्थिक गरजेसह कौटुंबिक स्तरावर असलेल्या समस्यांबाबतही सतर्क राहून , वेळेवेळी मदत करून, पतसंस्थेबद्दल सभासदांमध्ये अधिक विश्वास  निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सहाजिकच पतसंस्थेच्या  अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचेकडे वेळोवेळी सतत चालत आली आणि सेवानिवृत्त होताना पतसंस्थेचा अध्यक्ष म्हणून निवृत होण्याचे भाग्य लाभले. 
               आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे ऋणही त्यांनी मानले. जोपासले. याच भावनेतून त्यांनी कुळगांव -बदलापूर देशमुख मराठा  समाज मंडळ या संस्थेच्या स्थापनेत सक्रीय पुढाकार घेऊन या संस्थेच्या माध्यमातून समाज उन्नतीसाठी सतत क्रियाशील राहून अनेक सेवाभावी उपक्रम राबविले. समाजातील गरजवंतांचे  विविध स्तरावरील प्रश्न, कौटुंबिक प्रश्न, लग्नकार्य, कुटुंबातील आजार पणात लागणारी विविध स्वरूपाची मदत, कौटुंबिक वाद, प्रसंगी रक्तपुरवठा, अशा स्वरूपातील मूलभूत गरजांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन  सर्वसामान्यांना आधार दिला व ते सोडविण्याचे सातत्याने प्रयत्न केले. अर्थात  हे सर्व काम करत असताना जेथे काम करतो तेथील व्यवस्थापन, सोबतचे सहकारी त्याचप्रमाणे जेष्ठ समाजसेवक कै. बाळुमामा सुर्यराव यांचे सातत्याने मिळालेले पाठबळ, सदाशीव रघुनाथ देशमुख व रमेश महादेव देशमुख यांची मिळत गेलेली प्रेरणा व सहकार्य यामुळे हे सर्व काम सुलभपणे पार पडले हे सांगतानाच सुविद्य पत्नी सौ. दिपीका हीचा पावलागणीक मिळत गेलेला सहयोग यामुळेच हे सर्व शक्य झाले हे  व्दारकानाथ प्रामाणिकपणे कबुल करतात.
   म्हणूनच निरासक्त , निरअभिमानी, वेळ काळाचे भान न ठेवता प्रसंगी पदरमोड करून उपेक्षितांना सतत मदतीचा हात पुढे करणारे व्दारकानाथ सुर्यराव यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीच्या जीवनास हार्दिक शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...