आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ मे, २०२१

तौक्ते वादळाने घरांचे नुकसान झालेल्या आदिवासी बांधवांना सिटीझन वेल्फेयर असोशिएशन कडून मदतीचा हात

बदलापूर / प्रतिनिधी : बदलापूर शहरापासून जवळच असलेल्या आदिवासी पाड्यावरील आदिवासी बांधवांच्या घरांची तौक्ते वादळाने पडझड आणि नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर बदलापूर शहर सिटीझन वेल्फेयर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मिटिंग घेऊन संबंधित बांधवांना मदत करण्याचे ठरवले. याकामी असोसिएशनचे सरचिटणीस श्री राजेंद्र नरसाळे आणि सदस्य श्री सुहास सावंत यांनी पुढाकार घेऊन जेष्ठ सल्लागार श्री दिलीप नारकर यांच्या मार्गदर्शनानुसार रूपरेषा ठरवण्यात आली आणि रामदास सेवा आश्रमाचे पराग महाराज रामदासी यांच्या प्रमुख उपस्थितीत असोशिएशनच्या सदस्यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना घरावर झाकण्यासाठी उत्तम प्रतीच्या ताडपत्रीचे वाटप रामदास सेवा आश्रम येथे जाऊन करण्यात आले.
    याप्रसंगी रामदास सेवा आश्रमाचे स्वामी पराग महाराज यांनी उपस्थितांना अप्रतिम गोडव्याचे माधुर्य असलेले आवळा सरबत देऊन स्वागत केले तसेच सेवा आश्रमाच्या कामाचे स्वरूप सर्व उपस्थितांना सांगितले. वृद्धाश्रम आणि गोशाळेबद्दल माहिती दिली. गोशाळेतील गाईंपासून मिळणाऱ्या शेण आणि मलमूत्रापासून बनवलेल्या पर्यावरणपूरक जळाऊ लाकडांच्या उत्पादनाविषयी महिती दिली. हा उपक्रम अत्यंत सुंदर आणि शंभर टक्के पर्यावरणपूरक असल्याने जंगली लाकडाला पर्याय निर्माण होऊन जंगलसंपत्तीचे रक्षण होऊन पर्यावरणाची हानी थांबण्यास मदत होईल तसेच पारंपरिक मूळ देशी प्रजातीच्या गाईंचे रक्षण होईल असा विश्वास पराग महाराज यांनी व्यक्त केला. 
  गोशाळेतील गाईंची गोंडस वासरं आणि त्यांच्या स्पर्शाने परमेश्वरी सहवासाचा आनंद सदस्यांना घेता आला. वासरांबरोबर फोटो काढण्याचा मोह सदस्यांना आवरता आला नाही. 
   परमेश्वराचे वत्सल रूपच जणू त्या वासरांच्या किलकिल्या डोळ्यांतून अवतरल्याचा साक्षात आभास ! या कार्यक्रम प्रसंगी असोशिएशनचे उपाध्यक्ष श्री विलास हंकारे, सरचिटणीस श्री राजेंद्र नरसाळे, जेष्ठ सल्लागार श्री दिलीप नारकर, सहखजिनदार श्री मंगेश सावंत, सहसचिव श्री चंद्रकांत चिले, सदस्य श्री सुहास सावंत, सदस्या सौ. सुवर्णा इस्वलकर,सदस्य श्री विलास साळगांवकर, छोटा सदस्य कु. आर्येश नरसाळे आणि डॉ. अमितकुमार गोईलकर आदी उपस्थित होते. असोशिएशनचे अध्यक्ष श्री सुनील दळवी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.परतीच्या मार्गावर असोशिएशनच्या नवनिर्वाचित खजिनदार डॉ. निता पाटील यांच्या घरी/ कार्यालयास सर्वांनी सदिच्छा भेट दिली. 
एकंदरीत हा कार्यक्रम सर्व सदस्यांचा उत्साह वाढवणारा ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...