आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २८ मे, २०२१

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन"च्यावतीने - आॅनलाईन प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ; वीज वितरण, बँकिग व इतर सार्वजनिक क्षेत्रात खाजगीकरणामुळे, सर्वच क्षेत्रातील कामगार व ग्राहकांवर होणारे गंभीर परिणाम या विषयांवर विस्तृत चर्चा व मार्गदर्शन

मुंबई : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचेवतीने, गुगल मिटच्या माध्यमातून आॅनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. 
    प्रथम सत्रात मा. कृष्णाजी भोयर सर यांनी, महाराष्ट्रातील वीज निर्मितीच्या इतिहासापासून आजअखेर देशामध्ये घडलेल्या घडामोडींची इत्यंभूत माहिती दिली. वीज निर्मितीमध्ये खाजगी कंपन्या आल्या. केंद्र सरकारने नवीन कायदा आणला. पण खाजगी विज निर्मितीचा उदात्तीकरणाचा उद्देश व हेतू आजही सफल झाला नाही. वीजनिर्मितीबाबत २०२१ पर्यंत अनेक नवीन कायदे आणले. विजेचे दर ठरविण्याचे अधिकार केंद्र सरकारने स्वतःकडे घेतले. सबसिडी देण्याचे अधिकार केंद्र सरकारने स्वतःकडे घेतले. विज उद्योगातील कामगारांना पुढे संरक्षण मिळणे आवश्यक आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट मत मांडले. वीज उद्योगाचे खाजगीकरण झाल्यास, समाजातील वंचित व उपेक्षित घटकांवर होणारे परिणाम आदी.बाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
     दुस-या सत्रात मा. गिरीश भावे सर यांनी, सार्वजनिक सेवेमधील मुलभुत गरजा, शिक्षण, आरोग्य, परिवहन सेवा, इत्यादी बाबत सडेतोड मत व्यक्त केले. शिक्षण व आरोग्य सेवेमध्ये खाजगीकरण होवून मिळणाऱ्या सेवा, सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या झाल्या आहेत. सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची रा. प. परिवहन (एस. टी.) सेवा खाजगीकरण करण्याकडे वाटचाल करीत आहे. या सर्व सेवांमधुन कामगारांचे हित जपले गेले पाहिजे. सर्वच सार्वजनिक सेवांचा भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांमध्ये समावेश असून, केंद्र सरकारचे धोरण हे भांडवलशाहीस अनुकूल असलेने एकंदरीत देशाच्या प्रगतीसाठी, समाजातील सर्वच घटकांनी, याविरूद्ध आवाज उठविणे आवश्यक असलेचे प्रतिपादन केले.     
       तिसऱ्या सत्रात मा. विश्वास उटगी सर यांनी, बँकेच्या खाजगीकरणाकडे असलेली सरकारची वाटचाल हि, कामगार विरोधी व भांडवलदार यांना मोठे करण्याकडे असल्याचे सडेतोड मत व्यक्त केले. सुरूवातीच्या काळातील बँकांच्या निर्मितीबाबतचे धोरण व सध्याचे केंद्र सरकारचे भांडवलदारांना पोषक धोरण, यामुळे गोरगरीब जनता व सर्वसामान्य कामगार वर्गाचा बँकेतील जमा असणारा पैसा हा, खाजगी मालक वर्गांच्या ताब्यात जाणार असलेचे नमूद करून, भविष्यात हे मोठे संकट निर्माण होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला. कारण यापूर्वी अनेक भांडवलदार देशातील संपत्ती घेऊन, देश सोडून पळून गेलेचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील अनेक खाजगी बँकांना नफा होवूनही भागधारकांना लाभांश वाटत नाहीत, हि अतिशय खेदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. बँकांचे झालेले विस्तारीकरण व सध्याचे खाजगीकरणापर्यंतची कार्यवाही याबाबत अत्यंत मौलिक व अभ्यासपूर्वक माहिती त्यांनी दिली. यापुढील काळात आपले व पुढील पिढीचे भवितव्य सुद्धा बँकांवरतीच अवलंबुन असलेचे त्यांनी स्पष्ट केले. कामगार विरोधी धोरणांबाबत शिक्षण, बँका, रेल्वे, परिवहन सेवा इत्यादी सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांच्या हितासाठी मोठी चळवळ उभी करणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
    विषयपत्रिकेनुसार प्रश्नोत्तरांच्यावेळी, मान्यवर श्रोत्यांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांची - सन्मा. वक्त्यांनी समाधानकारक व अभ्यासूपूर्वक माहिती देऊन उपस्थित सर्वांचे समाधान केले.अध्यक्षीय मनोगतामध्ये - राज्यातील ३६ जिल्ह्यातील प्रमुख गुणवंत कामगार विधायक कार्यासाठी एकत्र येवून, "राज्य गुणवंत कामगार असोसिएशन"ची स्थापना केली असलेचे स्पष्ट करून, गेल्या वर्षभरात कोरोनामुळे लाखोंच्या नोक-या गेलेल्या आहेत. ज्यांच्या उरल्या आहेत, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सातत्याने पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. कोरोनाच्या काळात समाजातील सर्वच घटकांना केंद्र सरकारकडून दिलासा मिळण्याऐवजी, संविधानातील नमूद कायद्यांची पायमल्ली होताना दिसत आहे. कामगार कायद्यातील बदल, शेतकरी आंदोलन, सेवानिवृत्त पेन्शनधारकांबाबत अन्यायकारक धोरण, देशातील आरोग्य सुविधांचा बोजवारा, बी. एस. एन. एल, जे. एन. पी. टी, एअर पोर्ट आदींचे खाजगीकरण यामुळे देशासमोर मोठे संकट आवासून उभे आहे, त्याचा निकराने मुकाबला न केलेस आपले भविष्य अंधकारमय आहे, याबाबत समाजातील सर्वच घटकांचे प्रबोधन व्हावे, समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, कारण कोरोनामुळे देशात लाॅकडाऊन सुरू आहे. या कारणास्तव कोणालाही आंदोलने करता येत नाहीत, जमावबंदी आहे. या आपत्ती काळाचा केंद्र सरकार गैरफायदा घेऊन, देशात हुकूमशाही धोरण राबवित आहे. यासाठी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या माध्यमातून, सातत्याने आॅनलाईन कार्यक्रमांचे नियोजन करीत असलेचे, त्याचबरोबर राज्यातील ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात समाजाभिमुख व उल्लेखनीय कार्य केलेले आहे, त्यांना "कोरोना योद्धा गौरव सन्मानपत्र" देवून गौरविणार असलेचे, असोसिएशनचे अध्यक्ष - मा. सुरेश केसरकर यांनी, आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. 
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मा. भगवान पाटील (धुळे) यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. प्रस्ताविक मा. शिवाजीराव इंगवले (सातारा) यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मा. सुधीर मुंडे (बीड) यांनी आभार मानले. तर मा. देवराव कोंडेकर (गडचिरोली) यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
    यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्वच जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यध्यक्ष यांनी कार्यक्रम यशस्वी होणेकरीता योगदान दिले. यावेळी म. का. क. मंडळाचे मा. प्र. क. आयुक्त - मा. सतीश दाभाडे, म. का. क. मंडळाचे मा. सदस्य - मा. दत्तात्रय चौगले, विविध क्षेत्रातील तज्ञ व जाणकार मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, गुणवंत कामगार बंधू - भगिणी व सर्वच क्षेत्रातील कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...