आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २८ मे, २०२१

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम करणारे वनिता फांऊंडेशनचे खजिनदार मिलिंद निकाळे काळाच्या पडदयाआड.....!

विक्रोळी टागोरनगर येथील ज्येष्ठ समाजसेवक तक्षशिल मित्र मंडळाचे अध्यक्ष व वनिता फांऊंडेशन या सामाजिक संघटनेचे खजिनदार मिलिंद दामोदर निकाळे यांचे नुकतेच ४९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम रविवार दि. ३० मे २०११ रोजी विकोळी कन्नमवार नगर येथील राहत्या घरी आयोजित केला असून त्यानी सामाजिक बांधिलकाची जाण ठेवून केलेल्या कार्याची ओळख करून देणारा लेख प्रसिध्द करत आहोत.

"सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देव पुजिला ज्याने "अनंत त्यांची जीवनयात्रा कधी न सरे मरणाने || "

    विक्रोळीतील टागोरनगरचे रहिवाशी असलेले मिलिंद निकाळे यांचा जन्म १ सप्टेंबर १९७२ मध्ये एका गरीब कुटुंबात झाला असून त्यांचे वडील दामोदर निकाळे एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला होते. तर आई लक्ष्मीबाई दामोदर निकाले । होत्या. भाऊ व बहिणीसह पत्नी मृण्मयी निकाले, मुले गौरी, रिथ्वी, सिध्दांत व सर्वेश यांच्यासह विक्रोळी टागोरनगर येथील ग्रुप नं. ८ येथील हॉसिंग बोडांच्या बैठया चाळीत सन २०१४पास होते. सन २०१४- नंतर बैठया पुनर्विकास करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन दि सिचर टॉवर' या नावाने २० ते २५ माळयाच्या बिल्डींगचे काम सुरु आहे. त्यांच्या कार्याची ही एक पोचपावतीच असल्याचे समजते.
    मिलिंदचे प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण विदयामंदीर शाळेत झाले. आठव्या इयतेत असताना त्यांनी कामाला सुरुवात केलेली होती. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोणतेही पडेल ते काम करून शिक्षणाबरोबर नोकरीही करत. एस.एस.सी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवून कन्स्ट्रक्शन / बांधकाम क्षेत्रात त्यांना आवड निर्माण झाली. प्रथम त्यांनी RNA डेव्हलपर्स ग्रुपमध्ये लायझनिंग पदावर काम करू लागले या क्षेत्राचा त्याचा मोठा अभ्यास होता. वयाच्या १४ ते १५ व्या वर्षापासून कामाला सुरुवात केली होती. पदवी / डिप्लोमा घेतलेल्या व्यक्तींना हे काम जमत असे काम फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेऊन सहजरिया करणारा अवलिया म्हणजे मिलिंद निकाळे होते. मोठा भाऊ सुनिल निकाळे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुर्ण केले तसेच छोटा भाऊ मनोज निकाळे यांनासुध्या त्यांनी RNA डेव्हलपर्स ग्रुपमध्ये लावले असून बहिण वनितालाही महाराष्ट्र शासनातंर्गत असणाऱ्या एकात्मिक बालविकास प्रकल्पामध्ये 'अंगणवाडी सेविका म्हणून कामाला लावले. भाऊ सुनिल यांच्या सहकार्याने मुलगी गौरी व रिध्दी यांनी दहावी व नववीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून सिध्दांत व सर्वेश ही जुळी मुले सातव्या इयत्तेत पदार्पण करणार आहेत. असा त्यांचा कौटुंबिक परिवार सांभाळत विक्रोळी परिसरात कोणत्याही ठिकाणी जयंती व इतर उपक्रमात ते हिरीरीने सहभाग घेऊन अडलेल्या नडलेल्या गरजूना मदतीचा हात पुढे करणारे सर्वांचे लाडके प्रेमळ असे मनमिळाऊ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने विक्रोळी नगर परिसरात हळ व्यक्त करण्यात येत आहे.
     कोणतेही काम करत असताना ते काम मी केले असे कधीही बोलून दाखवत नव्हते. प्रसिध्दीपासून ते चार हात लांब होते. चाळीमध्ये असो वा बिल्डिंगमध्ये असो, कोणत्याही कामाला किंवा कार्यक्रमाला मदत करून बाजूला होत असे. जमेल तशी मदत करणारा दिलदार चळवळीचा कार्यकर्ता होता. मिलिंदचे वैयक्तिक जीवन फक्त स्वतःच्या घरापुरते मर्यादित नव्हते. त्यांचे निकाळे कुटुंब म्हणजेच वडीलाचे गाँव, आईचे माहेर, पत्नीचे माहेर, बहिणीचे व भावाचे सासर असण मोठा परिघ त्यांच्यासमोर होता. या सगळ्याकडे त्यांचे जाणे येणे होते. सगळ्यांना बरोबर घेऊन चालणे मिलिंदचा फार मोठा गुण होता. सर्वांना आपुलकीने व बरोबरीच्या नात्याने वागविणे हा त्याचा सहज स्वभाव होता. सहकारी गृहनिर्माण म्हणजे मोठमोठ्या इमारतीचे / / बैठया चाळींचे पुनर्विकास करणे हाच त्याचा ध्यास होता. रात्रंदिवस त्यांच्या मनीमानसी हाच विषय असे. शेकडो सोनावटयाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे व त्या सोडविण्यासाठी कार्यप्रवण होण्याची त्यांना संधी वाटायची, मी कमी शिकलो आहे. मोठया साहेबाशी / अधिकाऱ्याशी कसे काय बोलू शकती असे त्यांना कधीच वाटले नाही. पदवी / डिप्लोमा घेतलेल्या तरुणांना लाजवेल असे से काम करत होते. फक्त एस. एस. सी पर्यंत शिक्षण घेऊन अनुभवातून कन्स्ट्रक्शनलाईनचे कामे अगदी चुटकीसरशी करत असायचे. ऑफिस मधील सर्व कामगारांना कार्ड  पंचिंग केल्याशिवाय प्रवेश नाही, मग मिलिंदला नियम लागू नव्हता. कारण ते ऑफिसची सर्व बाहेरची कामे करत असून संध्याकाळी सहापर्यंत घरी येऊन सातच्या आत रात्रीचे जेवण घेत होते, थोडाजरी जेवायला उशीर झाला तरी ते न जेवत जायचे जेवण झाल्यावर टी बसता बाहेर राऊंड मारुन येत होते. त्याचे मोठेपण हे अथवा अविष्काराद्वारे अभिव्यक्त करण्याचे साधेसुधे नव्हते. अनेक मोठमोठया व्यक्ती त्यांच्या परिचित होत्या, ते कामानिमित्ताने अनेक व्यक्तिीची ओळख करून घेऊन सर्वांचे भले कसे होईल. या विचाराने प्रेरित झालेले असे महान व्यक्तिमत्व होते. आयुष्यभर त्यांची राहणी साधेपणाचीच होती. आजच्या काळात असे व्यक्तिमत्व असू शकते यावर कोणाचा विश्वास बसणार हा पैलू मला विचार करणारा ठरला असून आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघायचे. ते सर्वार्थाने मेहनती, बुध्दीमान, सत्वशील कुटुंब सदस्य होते. वयाच्या चौदा ते पंधराव्या वर्षापासून कामाला सुरुवात करून स्वतःला वाहून घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाची कायमची मुद्रा स्थानी उमटविली हे कळलेच नाही. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकानी काम करायला पाहिजेत.मिलिंद स्वभावत: सात्विक होते, म्हणूनच त्यांची धार्मिकताही होती, पण त्यांनी कधी कर्मकांडाचा बाऊ केला नाही. सोवळे ओवळे नाही की जातपात जुमानली नाही,  अनेक देवास्थानी जात पण त्याची भौगोलिक ऐतिहासिक माहितीही करून घेत असत. कोणत्याही प्रथेचा अगदी धार्मिकदेखील आजच्या सामाजिक समस्या सोडविण्याच्या संदर्भात उपयोग व्हायला हवा असे त्यांना मनापासून वाटत असे. ते सतत वर्तमानकाळात रमायचे, सुजनशीलता, शालीनता, बुध्दीमता आणि तत्परता याचे मूर्तिमंत प्रतिक म्हणजे मिलिंद .....!
    'पानी का रंग कैसा रंग मिलाणे तैसा' अशा प्रकारे शांत समईची ज्योत असा त्याचा स्वभाव होता. अनेक वेळा त्याना झालेल्या त्रासाबद्दल कधीच कुणाकडे तक्रार करत नव्हते. मी ठिक आहे. 'I am ok' असे म्हणून ते पुढे जात होते. काही तक्रार असल्यास बहिणीला हक्काने सांगत असायचे. त्यानी अनेकवेळा ऑफीसच्या कामानिमित्त दिल्लीवारीसुद्धा केलेली होती. ऑफिसला जाण्यासाठी व ऑफिसची बाहेरची कामे करण्यासाठी चार चाकी गाडी घेतलेली होती ती चालविण्यासाठी ड्रायव्हर होता. त्याचा पगार ते स्वतः देत होते. प्रत्येक ऑफिसरशी / अधिकाऱ्याशी गोडी गुलाबीने बोलून काम करुन घेत होते. मिलिंद म्हणजे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबवत्सल घरातील सर्वाचे लाडके व्यक्तिमत्व होते. त्याच्या आयुष्याच्या वेध घेण्याची संधी मिळाली हे काम तडीस नेताना मिलिंदच्या आयुष्याचे विविध रंग व रुप संपर्कात आलेल्या लोकांनी, मित्रांनी पाहिलेले आहे. एका महासागरात उडी मारल्यानंतर तुमच्या हाती विविध रंगाचे, आकाराची रत्ने सापडतील, त्याच्या अनुभवाचे / आयुष्याबद्दलचा नवा विचार तुम्ही करु लागाल ? असा हा अवलिया सगळयाना सोडून अवघ्या ४९ व्या वर्षात निघून जाणे, कुणाच्याही हातात नव्हते. प्रत्येकाची वेळ आल्यानंतर जाणे महत्वाचे असते, थांब म्हटल्यानंतर तो थांबू शकत नाही.
    कुटुंबातील प्रत्येकावर त्याचे बारीक लक्ष असायचे. प्रत्येकाशी त्याचा व्यक्तिगत संवाद होता. त्यांची आपुलकी व प्रेमळ वागण्यामुळे कोणताही आडपडदा न ठेवता मनातली प्रत्येक गोष्ट त्यांच्यासमोर सहज प्रवृत्तीने पुढे यायची, सर्वांच्या मनात त्यांच्या विषयी प्रेम होते. आपुलकी होती, त्याची साधी राहणी त्यांच्या खाण्यापिण्याचे फारसे चोचले नव्हते. घरात केलेला स्वयंपाक ते न कुरकुरता खायचे, त्यांचे जगण्यावर प्रचंड प्रेम होते. समृध्द व्यक्तिमत्वाने ओतप्रोत भरलेला कल्पवृक्ष उन्मळून पडला आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कुणीतरी अज्ञात शक्तीने आमच्यामधून कायमचा हिरावून गेला असे वाटते आहे. मिलिंद आपल्यात नाहीत पण त्यानी बांधकाम क्षेत्रात दिलेले योगदानच आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहील यात निळमात्र शंका नाही. त्याचे कर्तृत्व इतके मोठे होते मात्र त्याना मोठेपणाचा हव्यास कधीही नव्हता, मनाने मोठे होते, मात्र त्याचा कुठेही गाजावजा नसे. दिवसभर ते एका विलक्षण ऊर्जेने भारलेले असत. त्याचं व्यक्तिमत्व व बुध्दीमता, स्मरणशक्ती कामाची तळमळ एवढी प्रखर होती की, कोणी अधिकारी वा मित्रपरिवार व कुटुंबातील व्यक्तिीशी खोटे बोलून त्यांची दिशाभूल करण्याचं धाडस करु शकत नव्हते, तीस ते पस्तीस वर्षे त्यांनी अपार कष्ट केले. जे जे शक्य ते ते सर्व केले, घरच्यांनी त्यांच्या कार्यात कधीही आडकाठी आणली नाही, तो मनाचा राजा होता, दिलदार व्यक्तिमत्व होते. तसेच तक्षशिल मित्र मंडळाचे आधारस्तंभ व वनिता फांऊंडेशन या सामाजिक संघटनेचे खजिनदार म्हणून काम पहात होते. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम करणारे युवा नेतृत्व दि. २१ मे २०२१ रोजी काळाच्या पडदयाआड गेल्याने विक्रोळी टागोरनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विक्रोळी येथील ज्येष्ठ पत्रकार व गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांचे ते मेहूणे होते.
     वटवृक्षाच्या सावलीखाली छोटी छोटी रोपे वाढतात, मोठी होतात, पण आम्ही त्या वृक्षाचा आधार मात्र सोडत नाही. तशी अवस्था आम्हा सर्वाची झालीय. मिलिंद हा वटवृक्षच सर्वांना सोडून गेला. आम्ही सर्वजण त्यांच्या जाण्याने पोरके झालो इतकेच त्याच्या जलदान विधी कार्यक्रमाच्या निमित सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वांनी घरातूनच नतमस्तक होऊन आंदराजली वाहून दुःखात सहभागी व्हावे. हीच मिलिंदला श्रध्दांजली.

-प्रभाकर कांबळे (गुणवंत कामगार / संस्थापक वनिता फाऊंडेशन विक्रोळी)
संपर्क :९५९४२९३७३४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...