आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

आधुनिक युगातील देवमाणूस...

रतन टाटा म्हणजे आधुनिक युगातील देवमाणूस असच म्हणावं लागेल.देशावर व महाराष्ट्र-मुंबईत कोणतेही संकट आले की हा माणूस सहकार्य करण्यासाठी सर्वप्रथम पुढे येतोच.गेल्या 14 महिन्यांपासून कोविड संकटात यांनी अग्रेसर कशाप्रकारे सर्वाना मदत केली हे आपल्याला ठाऊक आहेच.आताही कोरोना दुसऱ्या लाटेच्या हाहाकारात व्हेंटिलेटर,औषधे,बेड व प्रामुख्याने जाणवणारा ऑक्सिजचा तुटवडा यामुळे अनेक रुग्ण दगावत असताना टाटांनी 200 ते 300 मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्र शासनाला देऊ केलय.मध्यंतरी कोणताही बडेजाव वा गाजावाजा न करता हा देवमाणूस आपल्या कंपनीतील एका आजारी  सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पुणे येथील निवासस्थानी भेटायला गेले होते,बिल्डिंगमधील अनेक सभासदांनी तेव्हा त्यांच्यशी संवाद साधला व टाटांचा साधेपणा त्यांच्या लक्षात आला. एवढे मोठे व्यतिमत्व एखाद्या कर्मचाऱ्याला स्वतःहून घरी भेटायला येतात,त्याला धीर देतात यातच सर्वकाही आले अशा भावना तेव्हा सोसायटीमधील रहिवाशांनी बोलून दाखविल्या.जेव्हा जेव्हा गरज असते टाटा सर्वप्रथम आपल्या राष्ट्राचा विचार करताना दिसतात व मदतीला धावतात.तेव्हा अशा या व्यक्तिमत्त्वविषयी सर्वाना आदर व प्रेम  आहेच. केंद्र सरकारने देखील त्यांच्या समाजसेवेचा विचार करून लवकरात लवकर त्यांना भारतरत्न किताब द्यावा अशी भावना जनमानसात आहे.

-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...