यासंदर्भात माजी खासदार संजय पाटील यांनी 5 ऑक्टोंबर 2020 रोजी सनराइज् रुग्णालयाने घेतलेले निर्णय, आणि अनधिकृत परवानगी व नियमबाह्य बाबी यासंदर्भात मुंबई मनपा आयुक्तांना पत्र पाठविले होते. सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी परिमंडळ 6 यांनी त्यांच्या पत्राला 16 ऑक्टोंबर 2020 रोजी उत्तर दिले होते. तसेच 21 ऑक्टोंबर 2020 रोजी उपप्रमुख अभियंता इमारत प्रस्ताव पूर्व उपनगरे यांनी मा. खासदार संजय पाटील यांना पाठवलेल्या पत्राला उत्तर दिले होते.
याबाबत ,संबंधित अधिकाऱ्यांनी पत्राची शहानिशा करून वेळीच योग्य ती खातरजमा केली असती तर हे 10 बळी गेले नसते. मात्र, दुर्घटना टाळली गेली असती. सदर रूग्णालयाला सातत्याने वाचवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न करता रुग्णालय कसे नियमानुसार सुरू आहे ,रुग्णालयाला कसे वाचवता येईल, अशा आशयाचे पत्र एस विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, व उपप्रमुख अभियंता यांनी मा. खासदार संजय पाटील यांना पाठविले होते.
संजय पाटील म्हणाले की, रुग्णालयाची उभारणी झाल्यानंतर साडे तीन वर्षाहून अधिक काळ रुग्णालय का बंद होते? रूग्णालयाला नियमबाह्य परवानग्या कशा मिळाल्या? आणि कोणी दिल्या?कोविड सेंटरला मान्यता प्रशासनाने दिली होती का? रुग्णालय प्रशासनाने मुंबई महानगर पालिकेच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केलेल्या होत्या का? याचे उत्तर प्रशासनाला देणे आवश्यक आहे. हॉस्पिटलचे संपूर्ण बांधकाम नियमबाहय आहे. मूळ मंजूर बांधकाम नकाशाच्या व्यतिरिक्त व फेरफार केलेले दिसून येते. अटी व शर्तीच्या अधीन राहून PART O/C देण्याची घाई केलेली दिसून येते . असे सांगून आवश्यक असलेल्या कोणत्याही परवानग्या न घेता सदर रुग्णालय बेकायदेशीररित्या सुरु केले होते. मनपा अग्निशमन दलाच्या विभागाने "ना हरकत प्रमाणपत्र" नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोपही माजी खासदार संजय पाटील यांनी केला आहे.
रुग्णालयाचे मालक ,ड्रीम्स मॉल चे मालक ,मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, उपप्रमुख अभियंता इमारत विभाग पूर्व उपनगरे ,या भ्रष्ट अधिकाऱ्यांची सखोलपणे चौकशी करून या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करावा व 1100 गाळेधारकांना शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी खासदार संजय पाटील यांनी केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा