आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

भांडुपमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू


मुंबई /किशोर गावडे- भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलगिरी व्यक्त करत मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. महत्वाचं म्हणजे करोना संकटामुळे मॉलला तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालय सुरु करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णालयाच्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...