आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २४ मार्च, २०२१

होळीवर मुंबईत बंदी ;रंगपंचमी साजरी करण्या वर मनाई ,नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास

मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी होळी, धुळवड आणि रंगपंचमी साजरी करण्यावर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातली आहे. कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी मंगळवारी जाहीर केले. काही महिन्यांचा तुरुंगवास आणि दंड असे कारवाईचे स्वरूप असेल. 

  कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी होळी-रंगपंचमी सण खाजगी व सार्वजनिक ठिकाणी साजरे करु नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. उल्लंघन केल्यास साथ नियंत्रण कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कारवाई होईल.

पथके असणार तैनात

   महापालिका होळी सणाच्या काळात संपूर्ण मुंबईभर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तयार करणार आहे. प्रत्येक प्रभागातील पथके सार्वजनिक ठिकाणांबरोबरच संकुलांमध्येही लक्ष ठेवणार आहे. कोरोना हॉटस्पॉट असलेल्या विभागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांचीही गस्त राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...