साधा सर्दी खोकला, हलकासा ताप, अंगदुखी अशी लक्षणे दिसून आली तरी लोकांच्या मनात भीती निर्माण होते व कोविड चाचणी करण्यासाठी देखील टाळाटाळ केली जाते. याकरिता घराजवळच चाचणी शिबिर ठेवल्यास लोकं स्वतःहून ही चाचणी करून घेण्यास पुढे येतील आणि विभागातील कोरोना बाधित रूग्णांना शोधून त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार करून त्यांना पूर्ण बरे करण्याच्या उद्देशाने व या रोगाचा प्रसारही थांबविण्यासाठी हे कोविड चाचणी शिबीर संपन्न झाले.
शासनाचे सर्व नियम तंतोतंत पाळून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व वयोगटातील एकूण १५० रहिवाश्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांच्या मोलाच्या सहकार्याने हे शिबीर घेणे शक्य झाले असे मंडळाचे अध्यक्ष श्री स्वप्नील सुर्वे यांनी सांगितले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी समिर सावंत ,अविनाश मोरे ,निलेश कदम , स्वप्निल सुर्वे , प्रतिक निगडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा