आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

' विचार क्रांती बदलणे आवश्यक ' .....

   नववर्षातील पहिला गोड सण म्हणजे " संक्रांत'. आणि ती रथसप्तमी पर्यंत असते. या दिवसात थंडीचे प्रमाण जरा जास्त असल्याचे रूक्ष त्वचेला तिळातील स्निग्धता, गुळातील गोडवा आणि तुपातील पौष्टिकता  हवी यासाठी तिळाचे लाडु व विविध पदार्थ करुन खाल्ले जातात. त्याचबरोबर सुवासिनींना वाण लुटण्याचे दिवस असतात. प्रत्येक सुवासिनीला दर वर्षी काय वाण वाटावे हा मोठा गहन प्रश्नच असतोचं.  पंधरा ते वीस रुपयांची टाकाऊ वस्तू देण्यापेक्षा लक्षात राहील व विशेष म्हणजे उपयोगी पडेल अशीच वस्तू दयावी.  वाण देताना सामाजिकतेचा विचार करायला हवा. जसे - थोरा मोठयांची आदर्श पुस्तके,  चांगल्या कवितांचे पुस्तक,  शब्दकोश, आदर्शांचे चरित्र,  ज्ञान वाढविणारी पुस्तके, तसेच लहान मुलांचे निबंध व व्याकरणाचे पुुस्तके असेच वाण दयावे.  जेणे करून सर्वांना उपयुक्त होईल.  संक्रातीला वाण लुटण्याचा आनंद मिळतो.  मग देणारीला व घेणारीला आनंद व समाधान नक्कीच  मिळायला हवा.. संक्रांतीला विचारांची नवक्रांती व्हायला हवी.  चांगले आचार व विचार दयावे व घ्यावेंत.  हळदी कुंकू हा स्त्रियांचा आवडता विषय आहे त्यामुळे त्यात नाविन्य हवेच. टाकाऊ वस्तू पेक्षा टिकाऊ वस्तूूचं कधीही श्रेष्ठ आहे.  टिकाऊ म्हणजे उपयुक्त अशी वस्तू.  कारण टाकाऊ वस्तूला किंमत नसते. आणि टिकाऊ ला कायमच डिमांड असते. महिलांनी हळदीकुंकू जरूर करावा. सौभाग्याचे लेणंच आहे ते.. पण याच निमित्ताने स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी काही तरी स्लोगन लिहिलेले ग्रीटिंग कार्ड दयावे.  किंवा मुलगी शिकली आणि प्रगती झाली तसेच बेटी बचाओ  असा अमूल्य संदेश ही द्यावा. मुली वाचावावी व शिकवावी ही काळाची गरज आहे मग त्यासाठी आपण महिलांनी पुढाकार घयायला हवा .. विचार बदलून नवीन क्रांती घडवून आणली पाहिजे तरच देशाची प्रगती होईल.  असे वाण लुटण्याचे समाधान ही निराळेच असते. 

  -सौ. स्नेहा मुकुंद शिंपी  
   नाशिक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...