आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

विक्रोळीत पार पडले "आमदार चषक" ; घाटकोपरच्या गणपती मंडळाने मारली बाजी

मुंबई : आजच्या तरुणाईला क्रीडा क्षेत्रात योग्य ते स्थान मिळावे तसेच तरुणाईला या क्षेत्रात उंच उंच शिखरे गाठता यावे या हेतूने सलग ३७ वर्ष विक्रोळी येथील महाड तालुका क्रीडा मंडळ अस्सल मातीतला खेळ कबड्डीचे आयोजन करते.यंदा या कबड्डी स्पर्धेचे वैशिष्ट्य सांगायचे तर विक्रोळी येथील शिवसेना पक्षाचे कार्यसम्राट व डॅशिंग  आमदार सुनिल राऊत यांच्या सहकार्यातून ,मार्गदर्शनातून आणि आर्थिक सहकार्यातून भव्य दिव्य आमदार चषक सामने दिनांक २४ जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत भरविण्यात आले होते.प्रामुख्याने पुरूष गटाचा  या सामन्यांमध्ये सहभाग होता.मंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष येरुणकर,उपाध्यक्ष शंकर पेडामकर, दगडू म्हामुणकर, क्रीडा प्रशिक्षक सहदेव मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा कमिटी अध्यक्ष संजय येरूणकर, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, सिद्धेश जाधव, खजिनदार कमलेश वनगुळे , सेक्रेटरी राकेश साळुंके , उप सेक्रेटरी मनोज गायकवाड  यांच्या नियोजनाने हे सामने अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सलग तीन दिवस पार पडले. या चषकासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.या चषकासाठी प्रथम क्रमांक रोख रु.७,७७७ आणि आमदार चषक, द्वितीय क्रमांक रोख रु.  ५,५५५  व आमदार चषक आणि उत्कृष्ट खेळाडू  ,उत्कृष्ट पक्कड , उत्कृष्ट चढाई असे व्यक्तिगत पारितोषिक ठेवण्यात आले होते.तसेच निवृत्त सुभेदार सहदेव मालुसरे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्ताने प्रत्येक कबड्डी संघास सन्मान चिन्ह व मेडल  (पदक) देण्यात आले. आपली सांघिक खेळाडू वृत्ती दाखवून यंदाचा आमदार चषकाचा मान गणपती क्रीडा मंडळ , घाटकोपर यांनी पटकावला तर उपविजयी संघ जय हनुमान क्रीडा मंडळ, विक्रोळी  तसेच उत्कृष्ट खेळाडू व्यक्तिगत चे पारितोषिक अशोक माईन ,  उत्कृष्ट चढाई स्वप्नील जगताप व उत्कृष्ट पक्कड चंदू बावलेकर यांनी मिळवला. विजयी संघातील आदेश सावंत याच्याशी बातचित केली असता त्यांनी पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली.

   " दहा वर्षांपासून मी कबड्डी खेळत आहे या मंडळात सलग पाच वर्षे मी येऊन खेळत आहे.खूप बरं वाटत आहे की अखेर पाच वर्षांनी का होईना आपल्या परिश्रमाचे फळ मिळाले.नियोजनाच्या बाबतीत हे मंडळ खूप उत्तम आहे. त्यांची ही शिस्तबद्ध पध्दतच आम्हाला येथे येऊन खेळण्यासाठी प्रोत्साहित करते."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...