आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

लोकजागर अभियान प्रणित 'ओबीसी जनगणना सत्याग्रहाची' पहिली सभा मुलुंड मध्ये संपन्न

 

मुंबई / प्रतिनिधी : लोकजागर अभियान प्रणित 'ओबीसी जनगणना सत्याग्रहाची' पहिली सभा रविवार, दिनांक नोव्हेंबर रोजी  दुपारी ४.०० वा. वैश्य समाज , मुलुंड महाकाली नगर, मुलुंड (पूर्व) मुंबई ४०००८१ येथे घेण्यात आली. ओबीसी जनगणना सत्याग्रह मार्फत 'आमची जनगणना आम्हीच करणार ही मोहीम महाराष्ट्र राज्यात राबवली जाणार आहे.या मोहिमेत दारोदारी जाऊन लोकांमध्ये जनजागृती निर्माण करत त्यांना जंगणनेच महत्व पटवून देत त्यांच्या कुटुंबाची जनगणना करून त्यांना देखील या ओबीसी जनगणना सत्याग्रहात सामील करून त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव निर्माण करण्यासाठी ही  सभा लोकजागर अभियान चे महासचिव मा. श्री महादेव मिरगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. यात मुंबई - कोकण चे विभागीय संयोजक मा. श्री रविंद्र रोकडे व तसेच लोकजागर अभियान चे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, आणि रायगड येथील नवनिर्वाचित समन्वयक, संघटक व संयोजक आणि सत्याग्रही उपस्थित होते. 

वैश्य समाज मंदिर चे भव्य असे कार्यालयात पहिल्या सभेचे आयोजन मुलुंड समन्वयक मा. श्री. विजय केसरकर यांनी केले.जिल्हा, तालुका व गाव, महानगरपालिका वार्ड स्तरावर समन्वय समिती कशी नेमणूक करता येईल? व ओबीसी जनगणना सत्याग्रह या राज्यात कसा व्यापकता निर्माण करता येईल या  संदर्भात शिस्तबद्ध पद्धतीने  नियोजन करण्यात आले. व सर्व समविचारी सत्याग्रही व पदाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.

     या ऐतिहासिक जनगणनेच्या या पहिल्या सभेला विजय केसरकर,  अनिल सोटे, सचिन राठोड, राजू चव्हाण, गणेश म्हात्रे, दिपक म्हात्रे, रविंद्र टेकाडे, अँड अशोक पोटे, संजय गुरव, संदेश कोठेकर, समीर पाटील,भालचंद्र ठाकरे, सचिन वाजे आदी प्रमुख मंडळींनी उपस्थिती दाखविली.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...