आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

गौतम गंभीरची धोनीवरील टीका चुकीची

    इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला दुबईमध्ये सुरवात झाली आहे. या स्पर्धेचे फटाके  फुटायला झाले आहेत. या स्पर्धेत मंगळवारी चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल यांच्यात सामना झाला. अटीतटीने लढल्या गेलेल्या  सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्स ने अवघ्या दहा धावांनी पराभव केला. या पराभवास कर्णधार महेंद्रसिंग धोनीच जबाबदार असून धोनीने आपल्या आधी सॅम करण व ऋतुराज गायकवाड या नवोदितांना पाठवले. स्वतः मात्र  सातव्या क्रमांकावर खेळण्यास आला. धोनीने आघाडीवर राहून लढायला हवे होते. स्वतः आघाडीवर राहून न लढणारा हा कसला नेता? अशीही जहरी टीका गौतम गंभीरने केली आहे. गौतम गंभीरने धोनीवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधीही त्याने अनेकदा धोनीवर टीका केली आहे. गौतम गंभीर भारतीय संघात असल्यापासून त्याचा धोनी बाबत आकस आहे. या आकसातून तो नेहमीच धोनीवर टीका करतो.  गौतम गंभीरची ही टीका वैयक्तिक आकसातून केली आहे हे क्रिकेट रसिक जाणून आहे. मुळात त्याने केलेली  ही टिकाच चुकीची आहे कारण धोनीने आपल्या आधी नवोदितांना पाठवले हा त्याचा निर्णय धोरणात्मक असेल. नवोदित खेळाडूंना आघाडीवर पाठवून त्यांना अटीतटीच्या सामन्यांच्या अनुभव देणे. अटीतटीच्या सामन्यात असणारा दबाव नवोदितांना झेलता यावा असाही विचार त्यामागे असेल. मुळात या सामन्यात चेन्नई सुपर किंगचा पराभव झाल्याने ही टीका होत आहे. याआधीच्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात धोनीने सॅम करणला आपल्या आधी पाठवले त्याने अप्रतिम खेळी करुन संघाला विजय केले हे विसरून कसे चालेल. त्यावेळी मात्र सॅम करणला आधी का पाठवले हा  प्रश्न कोणी विचारला नाही. धोनी आघाडीवर लढत नाही ही टीका देखील चुकीची आहे कारण २०११ मधील  विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीने आघाडीवर येऊन भारताला विश्वचषक मिळवून दिला. धोनी हा जगातला सर्वोत्तम फिनिशर आहे हे कोण नाकारेल? धोनीने भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले हे कोण विसरेल. आयपीएलमध्येही त्याने आपल्या संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. आताशी आयपीएल सुरू झाली आहे. पुढे खूप सामने आहेत त्यात धोनी आघाडीवर खेळेल यात शंका नाही. सुरवातीच्या सामन्यांत नवोदितांना अधिकाधिक संधी देण्याचे धोनीचे धोरण स्वागतार्ह आहे. क्रिकेट रसिक धोनीच्या या निर्णयाचे स्वागतच करीत  आहेत. धोनीवर  गौतम गंभीरने केलेली टीका चुकीचीच आहे म्हणूनच तो क्रिकेट रसिक त्याला आता ट्रोल करू लागले आहेत.  

-श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...