पालघर /प्रतिनिधी :
पालघर जिल्ह्यात नेशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्राच्या वाड्यातील पत्रकारांना शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाऊनमध्ये पत्रकारांची घरची परिस्थिती हलाखीची झाली आहे. एनयुजे ही पत्रकारांचे न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असल्याने अशा संकट प्रसंगी पत्रकारांना मदत करणे हे एकीचे लक्षण असल्याचे नेशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्राच्या अध्यक्षा शीतलताई करदेकर यांना सांगितले.
नेशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्राच्या कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांच्या पुढाकारानेने वाडा तहसीलदार उध्दव कदम यांच्या हस्ते एनयुजे महाराष्ट्र पालघर जिल्ह्याचे सचिव अनिल पाटील यांच्या उपस्थितीत वाडा एनयुजेएमचे पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या आधी एनयुजेमहाराष्ट्र च्या पुढाकाराने पालघर तालुक्यातील कमारे ग्रामपंचाय हद्दीतील ५५ आदिवासी गरीब बांधवांना पालघर तालुका तहसीलदार यांच्या मदतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच सफाळे येथील बीड जिल्ह्यातील मजुर अडकले होते. एनयुजेंमहाराष्ट्रने परवानगीसाठी मदत देऊन त्यांच्या त्यांच्या वाहतूकीचा मार्ग मोकळा करून दिला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा