आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १२ मे, २०२०

आदिवासी मजूरांना त्यांच्या मूळ गावी त्वरित पोहचवा - आदिवासी एकजूट संघटनेची मागणी

ठाणे -(प्रतिनिधी )

       पालघर जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव दर वर्षी वसई तालूक्यात मजूरी करीता स्थंलातरीत होत असतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही डहाणू, पालघर, बोईसर, तलासरी इत्यादी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव वसई तालूक्यात मजूरी करीता आले आहेत. येताना त्यांनी त्यांची लहान मुले आश्रमशाळेत शिक्षणाकरीता ठेवून आले होते. मात्र अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे आश्रमशाळेचे दरवाजे बंद करून शालेतील सर्व विद्यार्थांना आपआपल्या घरी पाठवण्यात आले.
      विद्यार्थी घरी पोहचताच बघतात तर काय, घरचे दरवाजे बंद. आईवडील मजूरीकरीता कूठेतरी गेले आहेत, हे विद्यार्थ्यांना माहीत होते. तरी पण विद्यार्थी आश्रमातून आपापल्या घरी आले. कारण की आश्रमाचे दरवाजेच बंद झाले होते. एकीकडे लहान मुले आईविना तळमळत आहेत. तर दूसरीकडे मूलाबाळांविना आईवडील तळमळत आहेत.
या प्रश्नांकडे आजवर कोणत्याही पक्षाने किंवा कुठल्याही आमदार खासदाराने ना कुठल्या नेत्याने लक्ष घातलेले नाही.
         यावर लक्ष घातल ते फक्त आदिवासी एकजूट संघटनेचे
संघटनेचे अध्यक्ष शेरू वाघ, कार्यकर्ते निलेश दलवी व संघटनेच्या इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने गावापाड्यात जाऊन लोकांची यादी तयार करून मा.तहसीलदार किरण सुर्वासे यांना निवेदन पोहचवले. परंतू आजवर तहसिलदारांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांमधे असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणात मा. जिल्हाधिकारी पालघर यांना निवेदन केले. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयातून लगेचच प्रतिसाद मिळाला. त्यांनी संघटनेला आश्वासन दिले आहे की, लवकरात लवकर सर्व मजूरांना मूळ गावी पाठविण्याचा प्रयत्न करू. आत्ता सर्वांचेच लक्ष लागले आहे की नेमके कधी पोहोचवतात मजुरांना घरी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या

दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...