आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १२ मे, २०२०

मनविसे तर्फे भांडुप- कांजूरमध्ये पोलिसांना जेवणाची व्यवस्था...

मुंबई -(अविनाश हजारे)

      लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईतील पोलिस बांधव प्रचंड तणावाखाली असतानाही अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ते झटत आहेत. त्यांची काळजी घेण्यात प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे. मात्र, सामाजिक जबाबदारी बाळगत  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून येथील भांडुप आणि कांजूरमार्ग पोलिसांना जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. 
       लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलीस इमाने इतबारे आपले कर्तव्य बजावत आहेत. अशावेळी कर्तव्य बजावत असताना त्यांना जेवणासाठी पुरेसा वेळही मिळत नाही. आणि जेवण व सोयी पुरविण्यात प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे. परंतु, पोलिसांची काळजी वाहत असताना मनविसे तर्फे त्यांना वेळोवेळी जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी पुढाकार घेताना पहायला मिळत आहे. 
      महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष निलेश सावंत यांच्या माध्यमातून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजतागायत पोलिसांसाठी जेवणाच्या पाकिटांची सोय केली जात आहे. या कार्यात निलेश सावंत यांच्या सहित महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य रितेश शंकर शेट्टी, प्रभाग क्र.१११ चे शाखाध्यक्ष गणेश सुरेश चव्हाण सह आदी. कार्यकर्ते सहभाग नोंदवत असल्याची माहिती निलेश सावंत यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या

दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...