ठाणे प्रतिनिधी: (अॅड.रणधीर सकपाळ)
सामाजिक बांधिलकी कशाप्रकारे जपावी याचा आदर्श समाजापुढे ठेऊन अध्यायन ट्युटोरिअल्स समूहच्या वतीने कोरोना ह्या संसर्ग रोखण्यासाठी कल्याण तालुक्यातील म्हस्कळ, अडीवली, दहिवली, हिराची वाडी, भांगलवाडी, कुंदा तसेच मानिवली ह्या आदीवासी पाड्यामध्ये जाऊन तिथे राहणाऱ्या गरीब आदिवासी बांधवाना मोफत कोविड मास्क वाटप करण्यात आले.यावेळी अध्यायन ट्युटोरिअल्स समुहाच्या वतीने श्री.जयंत सिंग, श्री.गणेश मोरे,डॉ.आशिष सिंग उपस्थित होते तसेच स्थानिक पंचायत समिती सदस्या सौ. रेश्माताई मुकेश भोईर,श्री.मुकेश भोईर आणि ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्री.जयराम भोईर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा