आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १ मे, २०२०

चटका लावणारी एक्झीट

          

         
   बुधवारी ज्येष्ठ अभिनेते इरफान खान तर गुरुवारी जेष्‍ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. ऋषी कपूर हे गेल्या दोन वर्षांपासून ल्युकेमिया आजाराशी लढत होते. ६७ वर्षाचे ऋषी कपूर यांचे लाखो चाहते असुन सिनेसृष्‍टीतील एक सदाबहार चेहरा म्‍हणून ते ओळखले जात होते. कोरोना आजाराच्‍या पार्श्‍वभुमीवर त्‍यांची या जगातुन झालेली एक्‍झीट नक्‍कीच चटका लावणारी आहे. ऋषी कपूर हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असत. विविध विषयांवर ते आपली रोखठोक मते मांडताना दिसत. ऋषी कपूर हे दिग्गज अभिनेते राज कपूर यांचे द्वितीय पुत्र होते. ऋषी कपूर यांना दोन भाऊ रणधीर कपूर आणि राजीव कपूर आहेत. तर ऋतू नंदा आणि रिमा जैन या दोन बहिणी आहेत. ऋषी कपूर यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९७३ साली बॉबी या चित्रपटातून केली होती. त्‍याअगोदर त्‍यांनी बालकलाकार म्हणून श्री ४२० आणि मेरा नाम जोकर चित्रपटातही काम केले होते. इमरान हाश्मीसोबतचा द बॉडी हा चित्रपट ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दोन वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. ऋषी कपूर हे व्‍यक्‍तीमत्‍व हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार, उत्‍साही असे होते. चित्रपटातील प्रमुख भुमिकांपासुन ते खलनायकाच्‍या भुमिका त्‍यांनी सहजरीत्‍या निभावल्‍या. त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला आहे. आजही त्‍यांचे चित्रपट व अभिनय मनाला भुरळ घालतो व खिळवुन ठेवतो. त्‍यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्‍यांच्‍या अभिनयात कृत्रिमतेचा जराही लवलेश नसायचा. 'कपूर' कुटुंबाचा कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. बुधवारी इरफान खान यांचं निधन झाल्यानंतर दुस-याच दिवशी  ऋषी कपूर यांच्या निधनाची आलेली बातमी संपूर्ण सिनेसृष्‍टी व चित्रपट प्रेमींसाठी धक्कादायकच आहे. जीवनाच्या अखेरपर्यंत चित्रपटसृष्टीशी आणि रसिकांशी नातं व संपर्क कायम राखलेले ते कलावंत होते. भारतीय चित्रपट जगताच्या इतिहासात त्याचं नाव व त्यांचा अभिनय नक्‍कीच अजरामर राहील. अशा हया महान कलावंतांना भावपूर्ण आदरांजली.

-वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आंगवली -रेवाळे वाडी भावकिचा भैरी भवानीचा गोंधळ थाटामाटात संपन्न

कोकण (शांताराम गुडेकर )रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसर...