आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २६ मे, २०२०

दि. महाराष्ट्रीय ऐक्यवर्धक पतपेढी कडून मुख्यमंत्री सहायता निधी कोविड -- 19 ला मदत ....!

   मुंबई दि  ( प्रभाकर कांबळे ) 

       घाटकोपर पूर्वे येथील बृहन्मुंबई कार्यक्षेत्र  असणारी  मुंबई विभागातील  सहकारातून समृद्धीकडे तसेच शतक महोत्सवाकडे  वाटचाल करणारी एक आदर्श पतसंस्था  म्हणून नावारूपाला आलेली  "दि. महाराष्ट्रीय ऐक्यवर्धक  परस्पर सहकारी पतपेढी  लि. कडून  कोरोनाविरूदधची  लढाई  जिंकण्यासाठी  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद  म्हणून   "मुख्यमंत्री सहायता निधी कोविड  19 ला" पंचवीस हजार रुपयांची  मदत दिली  आहे . या  रकमेचा  धनादेश  "मुख्यमंत्री  सहायता निधी कोविड  19 " एस. बी. आय. बचत  खाते  नंबर  39239591720  यावर एनएफटी   करण्यात आली असून  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हा  उपनिबंधक  ,व  उपनिबंधक एन  विभाग यांनी या  मदतीसाठी  पतपेढीचे अध्यक्ष  बी. ए. पोकळे यांचे  विशेष  आभार मानले असून सचिव  गजानन  खरात,   संचालक  विलास  मयेकर , संतोष  गुप्ता,   प्रभाकर कांबळे,   विलास शेळके,   संचालिका  एस. एस. मोरे,    निता  माने,   व्यवस्थापक संभाजी  रिवसे व कर्मचारी वर्गाचे तसेच सभासद, ठेवीदारांचेही मनापासून आभार व धन्यवाद मानले असून इतर  संस्थेनेही   कोरोनाविरूदधची लढाई जिंकण्यासाठी मदत  करावी असेही आवाहन यावेळी करण्यात आले असून अनेक  विभागातून संस्थेचे अभिनंदन करण्यात  येत आहे    
            
                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...