आपल्या कसदार व लाजवाब अदाकारीने भारतीय चित्रपटसृष्टी मध्ये स्वतः ची अशी वेगळी छाप निर्माण करणारा इरफान खान याची अनपेक्षित एक्झिट ... त्याचा ' इंग्लिश मिडीयम ' हा शेवटचा चित्रपट. हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी तो म्हणाला, " मैं आज आपके साथ हुं भी और नहीं भी । मेरे शरीर के अंदर कुछ अनवॉन्टड मेहमान बैठे हैं । उनसे वार्तालाप चल रहा हैं । देखते हैं किस करवट ऊंट बैठता हैं । जैसा भी होगा आपको इत्तीला कर दी जाएगी । " आपल्या अंतर्मनाशी सहजतेने संवाद साधणारा एक कसदार व अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ५३ व्या वर्षीच एक्झिट करणे मनाला चटका लावून जाते. इरफान खानने ' मकबुल ' , ' लाइफ इन अ मेट्रो ', ' द लंच बॉक्स ', ' पीकू ' , आणि ' हिंदी मीडियम ' अशा दर्जेदार कलाकृतीतून आपला वेगळा ठसा उमटवला, आणि आपला एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला. ' पानसिंह तोमर ' या चित्रपटातील भूमिकेबद्दल राष्ट्रीय पारितोषिक देण्यात आले. तसेच भारत सरकारने ' पद्मश्री ' 'किताब देवून त्याच्या कलेचा गौरव करण्यात आला.
इरफान खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली
-जयवंत पाटील,
माजी कार्याध्यक्ष, शिक्षक भारती,
कार्याध्यक्ष,
शिक्षक साहित्य संमेलन संस्था, व
शिक्षक भारती परिवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा