मुंबई (शांताराम गुडेकर): महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ जी शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री.मंगेश जी चिवटे व कार्याध्यक्ष श्री.रामहरी जी राऊत यांच्या सूचनेनुसार राज्य उपाध्यक्ष श्री.जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अकाली व अतिदक्ष बालकांसाठी गेल्या ३ वर्षांत १,२०० लिटर स्तनदूध संकलन करून ७००० हून अधिक नवजात बालकांचे प्राण वाचवले. त्यांनी दिलेले हे "जीवनदान" अमूल्य आहे.स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून कामा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.तुषार पालवे सर,आर.एम. ओ. डॉ.सुजाता जाधव,मिल्क बँक सिस्टर इन्चार्ज धनश्री जगताप,असिस्टंट मॅटरन निरुपमा डोंगरे,पी एन सी वॉर्ड इन्चार्ज अंजली कोलते यांचा आज सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच पाच "स्तनदुग्ध माता" यांचा श्रीफळ व साडी चोळी देऊन ओटी भरण्यात आली.यावेळी डॉ.पालवे सर यांनी दूधदान.... जीवनदान" हा संदेश दिला,.दुग्ध बँके बद्दल माहिती देताना कामा रुग्णालयातील उपलब्ध असलेल्या मोफत आई.व्ही.एफ. व कॅन्सर उपचारांबाबत माहिती दिली. याप्रसंगी मा.नगरसेविका सौ.वैशाली नविन शेवाळे, वैद्यकीय मदत कक्षाचे मुंबई सचिव डॉ.नवीन शेवाळे, दक्षिण मुंबई सचिव श्री.हितेश राणा, शिवडी विधानसभा प्रमुख सौ.गायत्री आंब्रे,मलबार हिल विधानसभा प्रमुख श्री.जयेश शिंपी, भारतीय केबल सेनेचे राष्ट्रीय सचिव श्री.राजेश जैन, श्री.दिनेश संकपाळ,सौ.स्नेहा मोहिते, श्री.सुदेश पांडे, श्री.ऋषिकांत उतेकर व इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६
भारताला रोबोटिक दुधारणाची गरज
जागतिक दुग्धव्यवसायात (डेअरी इंडस्ट्री) येत्या काळात एक शांत क्रांती घडत आहे. भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा सुमारे २५ टक्के इतका आहे, मात्र, तरीही दुधारण प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात भारत मागे पडत आहे.नेदरलँड्समध्ये नवीन दुधारण यंत्रणा उभारताना ८५ ते ९० टक्के शेतकरी स्वयंचलित (रोबोटिक) प्रणाली निवडतात. एकूणच डच (नेदरलँड्स) दुग्धशेतांमध्ये ४० टक्के पेक्षा जास्त, डेन्मार्क मध्ये ४० टक्के पेक्षा जास्त, स्वीडन मध्ये ३० टक्के पेक्षा जास्त दुग्धशेतांमध्ये आज रोबोटिक दुधारण प्रणाली वापरली जाते.
अमेरिका मधील शेतकरी देखील रोबोटिक दुधारण प्रणाली या तंत्रज्ञानाचा वेगाने स्वीकार करत आहेत. कारण अमेरिका मध्ये दुग्धव्यवसायातील कामगार खर्च एकूण उत्पादन खर्चाच्या १५ ते २५ टक्के इतका असतो. २०१५ ते २०२३ या काळात तेथील शेतमजुरांच्या वेतनात ४२ टक्के इतकी वाढ झाली आहे. रोबोटिक प्रणालींमुळे कामगारांची गरज ७० टक्के पर्यत कमी होते. तसेच दररोज २४ तास सुरळीत कामकाज शक्य होते.तुलना पाहिली तर फरक स्पष्ट दिसतो. भारतात केवळ २० ते २५ टक्के दूध संघटित क्षेत्राद्वारे हाताळले जाते तर ७५ ते ८० टक्के दूध असंघटित क्षेत्रात आहे. भारतीय पशुधन शेतीतील यांत्रिकीकरण (मेकॅनायझेशन) नगण्य आहे. विकसित देशांमध्ये शेतीतील यांत्रिकीकरण ८० टक्के पेक्षा जास्त असते, तर भारतात ते अत्यल्प आहे. भारतात रोबोटिक दुधारणेचा अवलंब अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
एक उत्साहवर्धक बाब म्हणजे, २०२३ ते २४ दरम्यान भारतीय मिल्किंग रोबोट बाजाराचा विकास दर २४.८ टक्के इतका होता. मात्र, तरीही आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. लेली इंडिया, डीलाव्हल इंडिया, बुमॅटिक इंडिया सारखे प्रमुख जागतिक ब्रँड्स भारतीय बाजारात उपलब्ध असले तरी त्यांचा स्वीकार मर्यादित आहे.
भारतीय दुग्धशेतकरी सातत्याने कामगारांच्या टंचाईची आणि उच्च मजुरीची तक्रार करतात. या क्षेत्रात कुशल कामगारांची उणीव आहे. जवळपास ७० टक्के दुग्धव्यवसाय कामगार महिला आहेत. यांत्रिकीकरणामुळे कामगारांची समस्या सुटण्यासह कामाची परिस्थिती सुधारु शकते.रोबोटिक दुधारण प्रणाली नियमित आणि सातत्यपूर्ण दुधारण वेळापत्रक, प्रदूषणाचा कमी धोका आणि जनावरांच्या आरोग्यावर चांगला अंकुश ठेवते. पारंपरिक पध्दतींच्या तुलनेत दूध उत्पादन कार्यक्षमता १५ ते २० टक्के पर्यंत वाढवू शकते.
युरोप आणि अमेरिकेतील दुग्धशेती यांत्रिकीकरणामुळे अधिक कार्यक्षम होत असताना, भारतीय दुग्धजन्य पदार्थाना जागतिक बाजारपेठेत कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, आपण या स्पर्धेत मागे पडू शकत नाही.
केंद्र सरकारने दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी २ हजार कोटी रुपयांच्या (सुमारे २४० दशलक्ष डॉलर) अनुदानाला मान्यता दिली आहे. तसेच दुग्ध सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी स्वयंचलित ऑनलाइन सुविधा देखील सुरु केल्या जात आहेत. या सकारात्मक बाबी असल्या तरी, रोबोटिक दुधारणेचा अवलंब वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिक आर्थिक पाठबळाची गरज आहे.
रोबोटिक दुधारणा तंत्रज्ञान पशुपालन व्यवस्थापन उत्तम बनवण्यासाठी, दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी, जनावरांचे कल्याण सुधारण्यासाठी आणि शेवटी चांगल्या नपयासाठी आहे.
होय, सुरुवातीची गुंतवणूक मोठी आहे. सुमारे २०० गायींच्या शेतासाठी पूर्ण रोबोटिक दुधारण यंत्रणा उभारण्यासाठी साधारण ३ ते ४.५ कोटी रुपये खर्च येतो. परंतु दीर्घकालीन कामगार खर्चातील बचत, दुधाच्या गुणवत्तेतील सुधारणा आणि २४ तास दुधारण क्षमता याचा विचार केला तर गुंतवणुकीवरील परतावा स्पष्ट दिसतो.
सर्व भारतीय दुग्धशेतकरी, अमूल सारख्या दुग्ध सहकारी संस्था आणि सरकारी यंत्रणांना रोबोटिक दुधारणेला गांभीर्याने घेण्याचे आवाहन करु इच्छिते. आपल्याकडे जगातील सर्वात मोठा दुग्ध कळप आणि सर्वाधिक दूध उत्पादन आहे. आता हाच सर्वात स्मार्ट (बुध्दिमान) दुग्धव्यवसाय बनवण्याचा काळ आहे. तंत्रज्ञान उपलब्ध आहे. गरज निकडीची आणि वेळ आता कृतीची आहे.
(लेखिका या अमेरिकेसह परदेशातील दुग्धव्यवसाय आणि कृषी क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ आहेत. त्यांना आधुनिक दुग्ध तंत्रज्ञान भारतात आणण्याची आणि भारतीय शेती आधुनिक बनवण्याची मनापासून इच्छा आहे.)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम
मुंबई (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...