मुबंई (सतिश वि.पाटील) : राज्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे. मूळ उत्पन्नावर कारवाई होत नाहीतर छोट्या टपरी चालकावर कारवाई केली जात आहे.१ जून २०२५ रोजी इगतपुरी येथे गुटख्याचे दोन ट्रक पकडले गेले. ठाणे येथे सुद्धा मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडला गेला होता. सदरील खात्याचे अधिकारी नाहीतर वरिष्ठ पदावरील अधिकारी यांचा या गुटख्याच्या विक्रीत समावेश आहे. गुटखा विक्रीत गंभीर आरोपी असणाऱ्या गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. पोलिस या गुन्हेगारांना कारवाई करण्यापेक्षा ड्रायव्हर यांच्यावर कारवाई करतात. सहभागी पोलिस अधिकारी आणि पोलिस संरक्षण असणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज विधान परिषद सभागृहात केली.साधारण गुटखा बाहेरील राज्यात निर्मिती करण्यात करण्यात येतो मग प्रश्न असा की कोणत्या मार्गातून महाराष्ट्र राज्य राज्यात येतो.याला सर्व यंत्रणाच जबाबदार आहे.लहान टपरीवर कारवाई फक्त एक दिखावा आहे बनवणारे मालक कधी पकडले जाणार ? असा गंभीर प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.हल्लीच ठाणे,वसई येथे गुटखा साठा जप्त केला होता.या घातक गुटख्या व्यसनाला चाप बसेल अनेक पिडीत तरुण या व्यसनाला बळी पडतात शाळा व काॅलेज विद्यार्थी ही गुरफटत जात आहेत वेळीच या कडे सरकार व गृहमंत्रालय यांनी लक्ष केंद्रित करून धडक कारवाई करून गुटखा किंगला व दलाल यांना जेरबंद करण्यात यावे !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गुटखा बंदी पण कारखाने बंद का नाही होत! विधान परिषद सभागृहात मा. अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते (उ.भा.ठा. )यांची मागणी !!
मुबंई (सतिश वि.पाटील) : राज्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे. मूळ उत्पन्नावर कारवाई होत नाहीतर छोट्या टपरी चालकावर का...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा