आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३० जून, २०२५

छावा संस्थेकडून वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम

पेण ( पी.डी.पाटील) सोमवार दि. ३० जून २०२५ रोजी  छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संघटना यांच्याकडून खारेपाट भागातील 
जनवली,ठाकूर बेडी येथील रस्त्याच्या कडेला आंबा, जांभूळ, फणस, गोड चिंच, उंबर अशा फळं झाडांची लागवड करण्यात आली. या फळांचा आस्वाद वाटसरूंना मिळावा, त्यांना सावली मिळावी व निसर्गाचे संतुलन रहावे हे उद्दिष्ट ठेवून हा वृक्षारोपण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी  संस्था अध्यक्ष जितेंद्र ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभागी होऊन हा  उपक्रम यशस्वी केला. त्यांच्या या कार्याचे गावकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

छावा संस्थेकडून वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम

पेण ( पी.डी.पाटील) सोमवार दि. ३० जून २०२५ रोजी  छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संघटना यांच्याकडून ...