आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने कर्जत तालुक्यातील कडाव येथील सापेले आदिवासी पाड्यावर फराळ वाटप...!

कर्जत(गुरुनाथ तिरपणकर)जनजागृती सेवा संस्था ही सामाजिक क्षेत्रात नेहमीच समाजाचे गांभिर्य लक्षात ठेवून वावरत असते.विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ही संस्था आणि संस्थेचे सभासद समाजकार्य करण्यासाठी नेहमीच तयार असतात.कर्जत येथील संस्थेच्या सदस्यांनी हा फराळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता. दीपोत्सव अर्थात अंधार भेदून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा संदेश देणारा सण. गरीब व गरजू लोकांची दिवाळी गोड जावी या उद्देशाने दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्थेने कर्जत तालुक्यातील कडाव येथील सापेले आदिवासी पाड्यावर लहान मुलांना चाॅकलेट, आदिवासी भगिनींना आकर्षक पणती व फराळ वाटप करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष व पत्रकार पंकेश जाधव,अॅड.सई सावंत, वनिता पाटील, रोहित पाटील हे उपस्थित होते. आदिवासी पाड्यावरील भगिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आला. फराळ वाटप उपक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन भंडारी, दत्ता कडुलकर,गंधाली तिरपणकर, संचिता भंडारी, पत्रकार पंकेश मधुकर जाधव, सार्थक भंडारी यांनी विशेष परिश्रम घेतले. हा उपक्रम संस्थेच्या सचिव सौ.संचिता सचिन भंडारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन यशस्वीरित्या राबविला,त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी त्यांचे विशेष आभार मानले. शेवटी उपस्थित बंधु-भगिनींना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन ;संजय,अजय,आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर

मुंबई (प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व.हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित...