आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०२४

कामगारांनी कामगार म्हणून सिमित न राहता, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून तळागाळातील समाजासाठी काम केल्यास, सत्कारातून काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळते -------आमदार सतेज पाटील

राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
----------------------------------------
चंदगड (प्रतिनिधी) सर्व कामगारांनी कामगार म्हणून सीमित न राहता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून तळागाळातील समाजासाठी काम केल्यास त्यांचा सत्कार केला जातो व सत्कारातून पुढे कार्य करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळते, असे गौरवोद्गार राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आमदार सतेज पाटील यांनी काढले.
        कामगार म्हणून काम करताना स्वतः पुरस्कार्थी बनून न थांबता, संघटनात्मक बांधणी करून समाज अधिक बळकट करण्यासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी करून महाराष्ट्रात एक क्रांतीपर्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सर्व पुरस्कार्थीनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 
        राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरीक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगतीसाठी सातत्याने समाजभान जपत भरीव कार्य करणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रीडा, आरोग्य, पत्रकारिता, सहकार, उदयोग, कृषी, शासकीय व निमशासकीय सेवेत वैशिष्ट्यपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकापर्यंत सेवाभावी वृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा राष्ट्रीय पातळीवरील 32 व राज्य पातळीवरील 29 सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर व्यक्तींचा तसेच राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी यांचाही समाजसेवेतील अतुलनीय कार्याबद्दल जाहीर नागरी सत्कार आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ व कोल्हापुरी फेटा देऊन शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नुकतेच गौरविण्यात आले. 
      यावेळी राजयोगीनी ब्रहमाकुमारी सुनंदा दिदीजी यांनी सत्काराला उत्तर देताना, जागतिक पातळीवर असलेली युद्धजन्य परिस्थिती, देशात वाढलेली अराजकता, कौटुंबिक कलह या सर्व समस्या मानसिक आरोग्याशी निगडीत आहेत. स्वतःला आध्यात्मिक प्रवाहात सहभागी करून मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केल्यास विश्वशांती निर्माण होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.
      सदर कार्यक्रम प्रसंगी सहा. कामगार आयुक्त विशाल घोडके, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, शिक्षक नेते भरत रसाळे, निर्मिती विचार मंचचे अनिल म्हमाने आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात आमदार सतेज पाटील व प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली असून राजेंद्र निकम, संभाजी पवार, सचिन खराडे आदींचा प्रमुख उपस्थिती मध्ये समावेश होता. व्यासपीठावर प्रमुख मान्यवरासह महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशन चे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते .
            राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा यांच्यावतीने सर्वच मान्यवरांचे सम्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले असून सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबे यांनी शेवटी सर्वांचे आभार अनिता काळे यांनी मानले 
      सदर कार्यक्रम प्रसंगी ३६ जिल्ह्यातील राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, विभागीय प्रतिनिधी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गुणवंत कामगार बहुसंख्येने उपस्थित होते. 
    सदर कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होणे करिता राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे व जागृत नागरिक सेवा संस्थेचे संजय सासने, संभाजी थोरात, रूपाली निकम, अनिता काळे, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, भगवान माने, सुभाष पाटील, संतराम जाधव, बाळासाहेब कांबळे, केरबा डावरे प्रभाकर कांबळे , भरत सकपाळ, दत्तात्रय शिरोडकर , संतोष तावरे, संजय गुरव, प्रविण भिके, बाजीराव हेवाळे, रघुनाथ मुधाळे, संदिप सुतार, सुनिल पाटील, धर्मेंद्र वंजिरे, प्रताप घेवडे, धनगर आदींनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...