आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २९ जुलै, २०२४

वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

मुंबई (गणेश हिरवे)वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत दिनांक २२ ते २८ तारखेपर्यंत साजरा होणाऱ्या शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक २७ जुलै रोजी शाळेतील शिक्षक अक्षय जाधव, प्रज्ञा करमाळे, आरती कानोजिया यांनी मुख्याध्यापक फादर निकी, उपमुख्याध्यापिका रोझ लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मैदानात वृक्ष लावले.यावेळी अनेक पालक आणि विद्यार्थी देखील उपस्थित होतें.शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात एकच दिवशी वृक्षरोपण होऊन लाखो झाडे लावण्यात आली.यावेळी या झाडांचे संपोपन करण्याची काळजी देखील नक्कीच घेतली जाईल असे विद्यार्थ्यानी सांगितलें.दिवसेंदिवस बेसुमार होणारी वृक्षतोड आपल्याला नॅचरल ऑक्सिजन मिळण्यासाठी घातक ठरत असून यामुळे आपण ग्लोबल वॉर्मिग ला आमंत्रण देत आहोत.तेव्हा प्रत्येकाने वर्षात किमान पाच दहा वृक्ष लावायलाच हवेत असे आवाहन उपस्थितांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...