आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ३ मे, २०२४

विठ्ठल नगर येथे श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन

पेण (पंकज पाटील)- खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथसंप्रदायातील श्री.गोरक्षनाथ महाराजांचा जन्मोत्सव सोहळा शनिवार दि.४ मे रोजी चैत्र-वरूथिनी एकादशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने अन् उत्साहात साजरा होत आहे.

     यावर्षी  गुरुवार दिनांक २ मे ते ३ मे दरम्यान अभिषेक व कलश पूजन, श्रींची महाआरती नंतर भजन , हरिपाठ कार्यक्रम , रात्रौ महाप्रसाद , त्यानंतर कीर्तन अशा प्रकारची कार्यक्रमाची रूपरेषा आहे. शनिवारी उत्सवाच्या मुख्य दिनी सकाळी ०९:३० ते १२: १५या वेळेत श्रींच्या जन्माचे ह.भ. प प्राची मंदार व्यास यांच्याकडून कीर्तन होऊन जन्मसोहळा साजरा होईल .जन्मसोहळ्यानंतर महाप्रसाद, दुपारी १ वा. भजन,तसेच रात्रौ १२ वाजता श्रींच्या प्रदक्षिणा होतील . यावेळी नवस दुपारी ३:३० नंतर आणावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
   उत्सवासाठी विठ्ठलनगर, घोडाबंदर, मंत्रीवाडी,मलेघरवाडी,ठाकुरबेडी,जनवली बेडी, तामशीबंदर, बोरकर वाडी, पैरणकर वाडी, बहिराम कोटक लाखोले , म्हात्रे ठाकूर वाडी व इतर बेडेकरी मंडळींचे सहकार्य लाभणार आहे . तरी या श्री गोरक्षनाथ उत्सव सोहळ्याचा 
पंचक्रोशीतील सर्व भाविक , बंधु -भगिनी अशा सर्वांनी लाभ घ्यावा.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...