आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १ मे, २०२४

योगिता हिरवे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

मुंबई (पूनम पाटगावे)- पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय कुर्ला येथील शिक्षिका योगिता गणेश हिरवे यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्या या शाळेमध्ये सन २००१ पासून शिकवीत असून विद्यार्थी प्रिय आणि उपक्रमशील शिक्षिका आहेत.अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले असून आज ते मोठमोठ्या हुद्यावर कामाला आहेत.योगिता यांचे पती गणेश हिरवे यांना देखील हा पुरस्कार मिळाला असून एकच दिवशी हिरवे दाम्पत्यांना पुरस्कार मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून वाणिज्य मंत्री तसेच खासदारकीचे उमेदवार पियूष गोयल, माजी सांसद गोपाळ शेट्टी, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, मा नगरसेवक प्रकाश दरेकर, मुख्य संयोजक मच्छिंद्र परचांडे आणि कार्यक्रमाचे आयोजक तसेच शिक्षक आमदारकीचे उमेदवार शिवाजी शेंडगे सर उपस्थित होते.यावेळी शेंडगे सरांना बहुमताने विजयी करणारच असा जल्लोष उपस्थित सर्व शिक्षकांनी केला.आमदारकीचे उमेदवार शिवाजी शेंडगे सर उपस्थित होते.यावेळी शेंडगे सरांना बहुमताने विजयी करणारच असा जल्लोष उपस्थित सर्व शिक्षकांनी केला. शाळेतील शिक्षक आणि सर्वांनीच हिरवे मॅडम यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...