आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २१ एप्रिल, २०२४

वढाव येथे १३ वर्षीय मुलीचा काविळीने मृत्यू

पेण  (वा.) तालुक्यातील वाशी खारेपाट भागातील वढाव येथील पूर्वा प्रमोद म्हात्रे वय वर्षे १३ या मुलीचा नुकताच कावीळ या आजाराने मृत्यू झाला. तालुक्यासह वाशी खारेपाट भागात सध्या कावीळ या आजाराने आपले बस्तान मांडले असुन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच काही रुग्ण खाजगी रुग्णालयात जातात त्यामुळे रुग्णांचा नक्की आकडा समजू शकला नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच कावीळमुळे दिव गावातील १० वर्षाच्या मुलाचे कावीळ या आजाराने मृत्यू झाला होता. ही बातमी ताजी असताना वढाव गावातील पूर्वा या मुलीचा कावीळमुळे मृत्यू झाला. पूर्वाला कावीळची लागण झाली असल्याने तिला पेण येथून ७ दिवसांपूर्वी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आजारावर पूर्वाची झुंझ कमी पडली आणि पूर्वाचा मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...