आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

आठवणीत रंगला १९८८-८९ च्या दहावीच्या बॅचचा ३५ वर्षांनी स्नेह मेळावा


        आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा..!शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई -वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते.ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाही हे सत्य आहे.
      जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते... मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना आजचे नाही उरत भान.... क्षण ते परत ना येतील आता... तीच होती सुखाची खाण...आठवणी असतात अनेकांच्या, तुमच्या. माझ्या.. सर्वांच्या..प्रत्येकांची असते एक तरी आठवण...!
             शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते.निमित्त होते जनता विद्यालय आंगवली विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे....रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु. पो.आंगवली गावातील जनता विद्यालय आंगवली मधील सन १९८८-८९ ची बॅच मधील मित्र-मैत्रिणी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येऊन तब्बल ३५ वर्षांनी एकत्र येण्याचे ठरले.जनता विद्यालय आंगवली या स्कुलची एस.एस.सी १९८८- १९८९ ची बॅच मुंबई मध्ये प्रथमच सभा आणि स्नेह संमेलन रविवार दि. २१ एप्रिल २०२४रोजी सायं. ठिक ४ ते ७ या वेळेत सद्गुरु क्लासेस,११० पहिला माला ,पर्ल सेंटर सेनापती बापट मार्ग ,येवले चहाच्या ,दादर ( पश्चिम )मुंबई -२८ येथे पार पडला.
              यामध्ये ११ मित्रमंडळीनी हजेरी लावली होती.यावेळी बालपणीच्या आठवणी तसेच स्वयं परिचया मधुन आपल्या कुटुंबाची माहिती आदान प्रदान केली. थट्टा मस्करी यात वेळ रंगून गेला होता.श्री. संतोष करंबळे,सौ. वैशाली बुरटे (गोंधळी ) दिलीप करंबळे, सुभाष सनगले, जयश्री मांगले (लाड ), शांताराम गुडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.संतोष करंबळे यांनी यानिमित्ताने आपल्याला सोडून गेलेल्या (निधन )मित्र -मैत्रीण यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.सौ.जयश्री मांगले (लाड),सौ.वैशाली बुरटे (गोंधळी ), सौ.जयश्री करंबेले (टेंगडे),सौ.मांगले अंजना तसेच सर्वश्री संतोष करंबेळे,शांताराम गुडेकर,दिलीप करंबेळे,विलास भोसले,सुभाष सनगले,सुनील परशराम,प्रकाश गोरुले यांनी या स्नेह मेळाव्यात सहभाग घेतला.३५ वर्ष भेट न झालेले मित्र -मैत्रीण भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. वाढत्या वयानुसार सर्वांमध्ये बदल दिसला. त्या वेळचे मित्र -मैत्रीण पटकन ओळखुन येत नव्हतं. प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. कौटूबिक स्थिती सांगितली. मुले काय करतात. सहचरणी /पती काय काम करतात वगैरे... वगैरे...!हे सर्वं करत असताना जिवाभावाच्या मित्र -मैत्रीण बरोबर काही आपले सुख -दुःख व्यक्त करून मनमोकळे केले.जणू काही त्यांनी मनातील ओझे मोकळे केले असं म्हणता येईल.यावेळी सर्वांनी एक निर्धार केला आणि ठरवलं की, दरवर्षी एकदा तरी आपण भेटायचं आणि शाळेच्या जीवनातील तो आनंद परत मिळवायचा.शिवाय आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेत आवश्यकता असलेल्या काही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, काही शालेय उपक्रमना हातभार लावणे. कमी होतं चाललेला शाळेचा विद्यार्थी पट कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणे यावर श्री. दिलीप करंबळे, संतोष करंबळे, सुभाष सनगले यांनी सविस्तर चर्चा केली.
            क्षण ते आता उडून गेले... आठवणीं आठवाव्या लागत नसतात.आपोआप त्या आठवत असतात. पालटून गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात.परतीच्या प्रवासाला निघताना सर्वांच्या डोळ्यात पाणी होते कारण एवढ्या वर्षांनी झालेली भेट काही क्षणातच संपणार होती.प्रत्येकाच्या मुखी एकच वाक्य होते पुन्हा कधी भेटायचे...!

-श्री. शांताराम ल. गुडेकर 
विक्रोळी पार्क साईट, विक्रोळी (प.)
मुंबई -४०० ०७९
मोबाईल -९८२०७९३७५९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...