आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

श्री स्वामी समर्थ कोकण वधु-वर मेळावा विरार येथे संपन्न

मुंबई (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर )
       सध्या लगीन सराई जोरात चालू असून वधू आणि वर यांचा योग्य जोडीदार मिळणे देखील कठीण परिस्थितीत निर्माण झाली आहे.मुला -मुलींचे करिअर मध्ये वय निघून जात असताना आई वडिलांना देखील आपल्या मुलांना योग्य जोडीदार शोधणे कठीण झाले आहे.याच निमित्ताने श्री स्वामी समर्थ कोकण वधूवर सूचक मंडळाच्या वतीने विरार येथे भव्यदिव्य असा वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला. हे मंडळ गेले दहा वर्षे ही सेवा अविरतपणे चालवत असताना संस्थापक सौ. साक्षी ताई परब यांनी सर्वात मोठं योगदान दिले आहे.या मंडळात आता पर्यंत शेकडो वधू-वरानी आपले नाव नोंदणी केली तर आता पर्यंत ३०० पेक्षा जास्त लग्न जुळवून आणण्याचा इतिहास या मंडळाने केला आहे. 
              रविवारी( दि. १४ एप्रिल) झालेल्या मेळाव्यात वधू वरानी चांगला प्रतिसाद दिला. तर संस्थापक साक्षी ताई यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपले कार्यालय विरार पूर्व येथे शॉप न १, विरार पोलीस स्टेशनच्या बाजूला, सागर झेरॉक्स, विरार पूर्व दर रविवारी सकाळी ११ते ८ वाजे पर्यंत सुरू असते तर नालासोपारा येथील कार्यालयात हे दर शनिवारी सुरू ठेवण्यात आले असून या मंडळाच्या वेबसाईटवर- sskokanvadhuvar.com या मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन आपण आले नाव नोंदणी करावी व 9607068820, 9637068820 या संपर्क नंबर व आपले माहिती द्यावी असे सूचित करण्यात आले. काल झालेल्या कार्यक्रमात त्याचक्षणी चार लग्न जुळवून पुन्हा एकदा विश्वासाचे नाते जोडले गेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...