आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

सूर्योदय सोसायटी व डी.डी. स्कीम – १५ मधील सदनिका व भूखंडाचे शर्तभंग नियमानुकूल संदर्भात आढावा.

अंबरनाथ /  अविनाश म्हात्रे :- सूर्योदय सोसायटी व डी.डी. स्कीम – १५ मधील सदनिका व भूखंडाचे शर्तभंग नियमानुकूल करण्यात येत असलेल्या प्रकरणांसंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. गोपाल लांडगे यांच्या प्रमुख उपस्थित आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी तहसिलदार, अंबरनाथ यांच्याकडून आढावा घेतला.

याआढावा बैठकीदरम्यान अंबरनाथ तहसीलदार यांच्यामार्फत सूर्योदय सोसायटी व डी.डी. स्कीम – १५ मधील सदनिका व भूखंडधारकांपैकी ५९७ अर्जदारांनी अर्ज सादर केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३४६ पैकी १२२ प्रकरणामध्ये त्रुटीबाबतचा अहवाल सादर करणेबाबत फेरचौकशीसाठी पुन्हा अंबरनाथ तहसिलदार कार्यालयाकडे अर्ज प्राप्त झालेले आहेत. तसेच मंडळ अधिकारी, अंबरनाथ यांच्याकडे चौकशी पाठवण्यात आलेले अर्ज असे एकूण ४६८ पैकी १४६ अर्जांमध्ये ग्रास प्रणालीद्वारे शर्तभंग नियामानुकुल करण्याची एकूण रक्कम रु. ६३६८८०३५/- एवढी रक्कम शासन जमा करण्यात आली असल्याबाबतची लेखी माहिती आमदार डॉ. किणीकर यांना देण्यात आली आहे. तसेच ज्या भूखंड व सदनिका धारकांनी अद्याप पर्यंत नियमानुकूल करण्याबाबत अर्ज सादर केलेले नाहीत. त्यांच्याकरिता तहसिलदार कार्यालयामार्फत शिबिर आयोजित करण्यात यावे अशा सूचना हि आमदार डॉ.किणीकर यांनी यावेळी तहसिलदार अंबरनाथ यांना दिल्या.
या बैठकीला माजी नगराध्यक्ष श्री. विजय पवार, श्री. सुनिल चौधरी, उपशहरप्रमुख श्री.संदीप मांजरेकर, श्री. गणेश कोतेकर, श्री.संजय सावंत, जेष्ठ माजी नगरसेवक श्री. नंदकुमार भागवत, माजी नगरसेवक श्री.सुनिल सोनी, श्री.सुभाष साळुंके, विभागप्रमुख श्री.शिवाजी गायकवाड, शाखा प्रमुख श्री. सुरेश कदम, उद्योग सेनेचे श्री.सुनील खरे, तहसीलदार सौ.प्रशांती माने, निवासी नायब तहसीलदार श्री. संभाजी शेलार, नायब तहसिलदार श्री. बंडू जाधव, तसेच सूर्योदय सोसायटीचे रहिवाशी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...