मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी अद्ययावत करण्याचे अभियान सुरू केले आहे.१८२ वरळी विधानसभा मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते- साईभाई रामपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवशक्ती फाउंडेशन, यांनी १८२-वरळी विधानसभा कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष भेटी देऊन, मतदार नोंदणीत नावे नसलेल्या किन्नर, अपंग व अंधाचा पन्नास नागरिकांचा शोध घेतला. त्यांना १८२ वरळी विधानसभा संघाचे नोंदणी अभियान मतदार अधिकारी डॉ. शिवाजी पाटील व वरळी विधानसभा संघाचे निवडणूक अधिकारी- महारुद्र वारे हस्ते मतदार नोंदणी फॉर्म देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते साईभाई रामपूरकर व शिवशक्ती फाउंडेशन चे अध्यक्ष - विकी शिंदे व पदाधिकारी- कार्यकर्तेचे हे कार्य कौतुकास्पद असून वरळीतील किन्नराना प्रथमच मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा