आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

जाणीव आश्रमातील आजी-आजोबांना जनजागृती सेवा समितीच्यावतीने फळ,बिस्किट,उटणे व दिवाळी फराळ वाटप

कल्याण- वसुवारस,दिवाळीचा पहिला दिवस.घरची दिवाळी होईलच.पण जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने कल्याण येथील मलंग गड रोडवरील आंभे गावातील जाणीव आश्रमात जाऊन तेथील आजी-आजोबांसोबत काही क्षण त्यांच्या सोबत राहुन दिवाळी साजरी करण्याचा आमच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण. त्यांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वहात होता, तो आमच्यासाठी आनंदी व भावनाविश प्रसंग होता. जाणीव आश्रमात जाताच संस्थापक मनोज पांचाळ सर यांनी स्वागत केल. आश्रमातील आजी-आजोबा यांना कस आणल गेल,कसे आले,त्यांची मनस्थिती काय, या संदर्भात मनोज पांचाळ यांनी सविस्तर माहिती दिली.पांचाळ वहीनी यांनीही आश्रमातील व्यवस्था कशाप्रकारे चालते याची माहीती दीली.त्यानंतर जनजागृतीचे ग्रुप सदस्य दिलीप नारकर,विलास हंकारे, दिलीप शिरसाट,राजेंद्र नरसाळे, मंगेश सावंत यांच्या हस्ते आजी-आजोबांना फळ,बिस्किटे,उटणे व दिवाळी फराळ देण्यात आला.सर्वांना मिळुन कंदील लावुन सजावट केली. आश्रमासंदर्भातील डाक्युमेंन्ट्रीही दाखविण्यात आली.आजी-आजोबांच्या चेह-यावरील आनंद हा आमच्यासाठी संस्मरणीय क्षण होता.या उपक्रमासाठी जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, जनजागृती ग्रुप सदस्य दिलीप नारकर,विलास हंकारे, राजेंद्र नरसाळे, दिलीप शिरसाट, मंगेश सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.शेवटी आजी-आजोबांचे आशिर्वाद घेऊन तसेच तेथील विठ्ठल-रखुमाई मंदीरात दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...