आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली रस्ते दुरुस्तीची मागणी



उरण -रायगड भुषण, जेष्ठ साहित्यिक प्राध्यापक एल.बी.पाटील यांनी गणपती सण जवळ येऊन देखील नवघर एस.टी.स्टॅंड ते नवघर गावापर्यंत तसेच नवघर,नवघरपाड्या पासून भेंडखळ कडे जाणा-या रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवण्या बाबत नवघर गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे सोमवार दिनांक २३/०८/२०२१ रोजी ठिक ११-३० वाजता द्रोणागीरी सिडको आ‌ॅफीस बोकडवीरा,उरण येथे नवघर गावाच्या आजु-बाजूच्या रस्त्यांची खड्डेमय परिस्थिती सिडको अधिका-यांच्या निदर्शनात आणून देऊन योग्यतो निर्णय घेण्यास भाग पाडू असे नवघर गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या बैठकीत निर्णय घेतला. त्या अनुषंगाने  सोमवार दिनांक २३/०८/२०२१ रोजी नवघर गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते सिडको आ‌ॅफीस द्रोणागीरी नोड बोकडवीरा येथे जाऊन संबधीत सिडको अधिका-यांच्या सोबत चर्चा विनिमय करून सिडकोचे वरीष्ठ अधिकारी एच.डी.नहाने यांच्याशी फोनवर बोलून नवघर खड्डेमय रस्त्यांची सविस्तर परिस्थिती सांगीतली.याबाबत तात्काळ ऍकशन घेत सिडकोचे अधिकारी इंजिनिअर जयेश तांडेल यांना घेऊन सदर खड्डेमय रस्त्यांची पाहणी केली.त्यावर योग्यती उपाययोजना म्हणून तात्पुरते का होईना पण गणपती सणा अगोदर म्हणजे २५ आ‌ॅगस्ट २०२१ पासून ते १ सप्टेंबर २०२१ पर्यंत संपुर्ण नवघर एस.टी.स्टॅंड ते नवघर गावापर्यंत तसेच नवघर,नवघरपाडा ते भेंडखळ गावाकडे जाणा-या तसेच या गावांच्या आजूबाजूला असणारे खड्डे बुजविण्यात येतील.पावसाळ्या नंतर या रस्त्यांसंबधी कायमस्वरूपी योग्यतो ठोस निर्णय घेऊ असे इंजिनिअर जयेश तांडेल यांनी उपस्थितांना सांगितले.केलेल्या मागणीची त्वरित दखल घेतल्याने नवघर गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी सदर सिडको अधिका-यांचे आभार मानले.यावेळी भारतीय जनता पार्टी चे युवा मोर्चा अध्यक्ष जयप्रकाश मधुकर भोईर, शिवसेना शाखा प्रमुख अविनाश म्हात्रे,ग्रामस्थ मंडळ नवघर अध्यक्ष जयप्रकाश नारायण पाटील,शेतकरी कामगार पक्षाचे नेते विश्वास बळीराम तांडेल,ग्रामपंचायत सद्यस्य गणेश रमाकांत वाजेकर,ग्रामस्थ मंडळ नवघर चे माजी अध्यक्ष योगेश तांडेल,ग्रामस्थ मंडळ नवघर चे खजिनदार ज्ञानेश्वर मधुकर भोईर,जेष्ठ पत्रकार मनोहर धनाजी भोईर आदी नवघर गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...