आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २५ जून, २०२१

माथेरान पर्यटन शनिवारी पासून सुरू ; माथेरानकरांच्या डोळ्यात आनंदाश्रूचा पाऊस

माथेरान /प्रतिनिधी : सलग दुसऱ्या वर्षी  मार्च महिन्या पासून कोरोना मुळे लॉक डाऊन निर्बंध   लागल्याने  अनेक कुटूंब उध्वस्त  झाले.  अनेकांना बिकट परिस्थितीला  सामोरे जावे लागतेय. माथेरान थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण.  येथील जनजीवन  हे केवळ येण्याऱ्या पर्यटकांवर अवलंबून असल्याने  सर्व जनता ,जीवनमान चिंतेत पडले आहे. आयुष्य भर प्रचंड अंगमेहनत करूनच आपले कुटंब जीवनमान जगनाऱ्या कुटूंबाना कोरोनाचा खूप फटका बसत आहे.   कोरोना काळात सर्वच व्यवसाय  काम धंदे बंद  राहिल्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा हा  मोठा यक्षप्रश्न उभा  ठाकला होता . आज माथेरान  शनिवार पासून (दि . २६ जुन) पर्यटकांना सुरू होत आहे ह्या  गोड बातमीनेच  माथेरानकर सुखावला आहे,

 रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मंदावली असून पर्यटनस्थळ माथेरान मध्ये सुध्दा बहुतांश लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.केवळ पर्यटनावर इथल्या नागरिकांचे संपूर्ण जीवनमान अवलंबूनअसते.त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शनिवार दि. २६ पासून माथेरान पर्यटकासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेले अनेक महिने आतुरतेने वाट पाहणारे पर्यटक ही सुखावला आहे. 

अगोदरच आगाऊ बुकिंग केलेल्या पर्यटकांची तसेच नवख्या पर्यटकांची शनिवार पासून मोठया प्रमाणावर इथे इनकमिंग पहावयास मिळणार आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे इथल्या सर्वसामान्य लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यातच  ई पास रद्द झाला तेव्हा पासूनच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मनोज खेडकर यांनी माथेरान करांना  माथेरान सुरू करा म्हणून हाक देऊन,  माथेरान सुरू व्हावे यासाठी  प्रयत्न करत होते.  माथेरानच्या प्रथम नागरिक सौ प्रेरणा सावंत  यांनीं ही नियमानुसार माथेरान सुरू होण्याकडे लक्ष दिले .  इथल्या भारतीय जनता पार्टी , म.न. से सह सर्व राजकीय पक्षांच्या मंडळींनी आपापल्या परीने प्रयत्न केले होते.लॉक डाऊन काळात स्थानिकांची अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. दुकानदारांचे तर खाद्यपदार्थं  व वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे .  मागील महिन्यापासून  मिळालेल्या धान्य किट व घोड्याच्या खाद्यामुळे मुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला होता.  इथे अन्य व्यवसाय नसल्यामुळे केवळ पर्यटनावर अवलंबून असणारे सर्व व्यापारी वर्ग, नागरिक,कष्टकरी लोक माथेरान अनलॉक होण्याची चातकाप्रमाणे वाट पहात होते.जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे माथेरान करांना दिलासा मिळाला आहे.

[[ "लॉकडाऊन मध्ये सर्वाधिक फटका हा पर्यटन स्थळांना  बसला आणि माथेरानच्या सामान्य माणसांना तो अधिक जाणवला.  या ठिकाणी पर्यटन शिवाय कुठल्याही उत्पन्नाचे  साधन नाही . सर्वाधिक  हातावर उपजीविका असणारे मजूर, रिक्षा चालक ,दुकानदार ,घोडेवाले यांचे अर्थकारणा  बरोबरच भविष्यातील स्वप्न धुळीस मिळाली असून पर्यटन स्थळ सुरू करण्याच्या या निर्णयाचे सर्व वर्गातून स्वागत होत आहे."]]

-शिवाजी शिंदे--नगरसेवक,  काँग्रेस पक्ष


 [[ "माथेरान हे सुरू होत आहे.  मनसे ने दोन दिवसांपूर्वी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता , त्याचेच फळ आज माथेरान सुरू होत आहे हे जाहीर झाले ही सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. येथील लोकांचा  व्यवसाय पूर्ण ठप्प झाला होता. आता माथेरान सुरू होणार त्यामुळे व्यवसाय सुरू होतील.   नागरिकांनी सुध्दा शासनाचे  सर्व नियम अटीचे पालन करावे."]]

-संतोष कदम  -अध्यक्ष म. न.से, माथेरान


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...