आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ मे, २०२१

भांडुपच्या दवाखान्यातील औषध निर्माता पद्माकर येवले निवृत्त

भांडुप येथील दवाखान्यातील औषध निर्माता पद्माकर येवले सेवानिवृत्त झाले. त्यांना कोरोना योध्दा म्हणून प्रमाणपत्र शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह प्रदान करताना डॉ.विलास मोहोकर , युनियन सेक्रेटरी अनिल घुमाणे ,वर्षा येवले , डॉ. रंजना तामोरे , डॉ.वर्षा कर्णिक छायाचित्रात दिसत आहेत. ( छाया प्रमोद कांदळगावकर )
प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका एस विभाग अंतर्गत म. वि. रा. शिंदे मार्ग येथील दवाखान्यातील मुख्य औषध निर्माता पद्माकर चिंधू येवले हे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. खरतर त्यांनी आपल्या कामगिरीतून ठसा उमटविला आहे. त्यांनी कोणतेही काम इमानेइतबारे करताना त्यांच्यामध्ये वेगळेपण जाणविला असे एस विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विलास मोहोकर यांनी एस विभागातील कार्यालयाच्या वतीने सेवापुरती कार्यक्रमात 'कोरोना योद्धा' प्रमाणपत्र व सेवापुरती स्मृतिचिन्ह प्रदान करताना गौरवोद्गार काढले. यावेळी म्युनिसिपल फार्मासिस्ट असोसिएशन सेक्रेटरी अनिल घुमान, दवाखान्याच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्ष वर्षा कर्णिक, डॉ. विजय माली, डॉ. नितीन महाजन, सेवानिवृत्त डॉ. रंजना तामोरे, सौ. वर्षा येवले व्यासपीठावर उपस्थित होते.
   पद्माकर येवले यांनी आपली नोकरी सांभाळून म्युनिसिपल फार्मासिस्ट असोसिएशनतर्फे माध्यमातून औषध निर्मात्याच्या समस्यांची सोडवणूक चांगल्याप्रकारे करण्याचा प्रयत्न केला. पण ते एक उत्तम गायक आहेत. त्यामध्ये सकारात्मकता दिसून येते असे सेक्रेटरी अनिल घुमाणे यांनी सांगितले.
       याप्रसंगी प्रतिभा फालक, डॉ. रंजना तामोरे, समाजविकास अधिकारी बाजीराव खैरनार, विठ्ठल मोरे, संजय राठोड, डॉ. विजय वाणी आदींनी येवले यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला.
आपल्या सत्काराप्रसंगी बोलताना पद्माकर येवले भावुक झाले. आपल्याकडून प्रदीर्घ सेवा कालावधीत भरपूर प्रेम मिळाल्याने भारावून गेलो आणि कोरोना महामारीच्या काळातसुद्धा सेवा करताना यशस्वी होऊ शकलो. हे सर्व तुमच्या प्रेमाखातीर घडू शकले. याबद्दल सर्वांचा आदर करतो आणि आभार व्यक्त्त करतो. असे नमूद केले. यावेळी डॉ. शामल गोरेगावकर, स्वच्छता निरीक्षक नित्यानंद पाटील, सेवानिवृत्त तंत्र विकास प्रधान सौ. मधुरा परब आदी प्रभृती उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमिता दामले यांनी अतिशय माफक शब्दात केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...