आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २८ मे, २०२१

दक्षिण मुंबईतील कुंभारवाडा विभागातील संत सेना महाराज मार्गाची दुरावस्था ; स्थानिक रहिवाशी त्रस्त

मुंबई : कित्येक वर्षे पासून पेव्हर ब्लॉग असलेल्या या मार्गावरील पेव्हर ब्लॉग उखडले गेले असून संपुर्ण मार्ग खड्डेमय झालेला दिसून येत आहे. येथे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या गटारातील सांडपाणी रस्त्यावर वहात येत असून त्या खड्यांमध्ये साचते अश्या साचलेल्या घाण पाण्यातून काही वेळा रहिवाश्याना मार्गक्रमण करावे लागते. सदर मार्ग भाजी गल्ली आणि मुख्य वर्दळीचा असल्यामुळे या रस्त्यावरून दररोज शेकडोंनी वाहने आणि अवजड माल भरलेल्या हाथगाडया ये - जा करत असतात. तसेच या मार्गावरून विभागातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मिरवणुका , लग्नांच्या वराती , दहीहंडी कालावधीत गोविंदा पथकाचे गोविंदा त्याचप्रमाणे गणेशोत्सवात विभागातील मोठं- मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या आणि घरगुती गणेश मूर्ती त्याचप्रमाणे  नवरात्रोत्सवात देवींच्या मूर्तीचे आगमन , विसर्जन सोहळे पार पडत असतात. मुंबईतील प्रख्यात "लालबागच्या राजा", उमरखाडी , चिंचबंदर, जे जे रुग्णालय अश्या मानाच्या  सार्वजनिक  मंडळांच्या भव्यदिव्य गणेश मूर्ती सदर मार्गावरून गिरगांव चौपाटीला विसर्जनासाठी मार्गस्थ होतात.रस्त्यावर  पडलेल्या अश्या खड्यांमुळे स्थानिक रहिवाश्याना , दुकानदारांना आणि वाहनचालकांना  त्रास होतो आहे. अनेक छोटे- मोठे अपघात या रस्त्यावर झाले आहेत. साधारणतः पाच वर्षापूर्वी  नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे  संत सेना महाराज मार्ग ( भाजी गल्ली ) मार्गाचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले परंतु ते काही कारणास्तव अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले. परंतु आता आम्हाला असे निदर्शनास येत आहे की विभागातील  आसपासच्या मार्गांचे कॉन्क्रीटीकरण करण्यात येत असताना विभागातील मुख्य मार्ग असलेल्या संत सेना महाराज मार्गाकडे जाणूनबुजून दुर्लक्षित केले जात आहे का असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे ?
      तेव्हा संबधित प्रशासकिय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेऊन लवकरात लवकर या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे काम चालू करावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...