आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २८ मे, २०२१

मतदार राजाने राजेश मोकल यांच्या बाजूने कौल देऊन इतिहास घडविला ;13 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी ठरावाच्या विरोधात केले मतदान

पेण (विनायक पाटील) :- पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांच्याविरुद्ध ग्रामपंचायतीच्या 13 विद्यमान सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठराव प्रस्तावाच्या अनुषंगाने वडखळ ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा व गुप्त मतदान जय किसान विद्या मंदिर वडखळ येथे आयोजित करण्यात आले होते. मतदार राजाने राजेश मोकल यांच्या बाजूने  कौल  देऊन इतिहास घडविला. 
     यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील  २१८१ मतदारांनी गुप्त मतदान केले.पहिल्या फेरीत 1000 मतांपैकी ठरावाच्या बाजूने 464 तर विरोधात 524 व 12 मते बाद झाली. पहिल्या फेरीत राजेश मोकल यांनी 60 मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत 1000 मतांपैकी ठरावाच्या बाजूने 521, विरोधात463 व 16 मते बाद झाली. या फेरीत 58 मते कमी पडल्याने राजेश मोकल यांच्याकडे 2 मतांची आघाडी होती. तिसऱ्या फेरीत 181 मतांपैकी ठरावाच्या बाजूने 85, विरोधात 91 व 5 मते बाद ठरल्याने अखेर 8 मतांनी राजेश मोकल यांना निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय कांबळे यांनी विजयी घोषित करून पुन्हा सरपंच पदावर तेच राहतील असे जाहीर केले.
      वडखळ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच वगळता एकूण पंधरा सदस्य असून त्यातील तेरा सदस्यांनी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला होता. यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, विकास कामे वेळेवर न करणे व दुर्लक्ष करणे, सरपंच यांचा मनमानी कारभार  या मुद्यावर अविश्वास ठराव घेण्यात आला होता. त्यामुळे विशेष ग्रामसभा घेऊन गुप्त मतदान घेण्यात आले. यात १० केंद्रात मतदान होऊन पाच टेबलवर  मतपत्रिका मोजण्यात आल्या.
 एकूण २१८१ मतदानापैकी 1078 मतदारांनी राजेश मोकल यांच्या बाजूने कौल दिल्याने ते ८ मतांनी विजयी झाले. यावेळी शासकिय यंत्रणे बरोबर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. विजयी झालेले सरपंच राजेश मोकल यांचे माजी सभापती संजय जांभळे,नगरसेवक निवृत्ती पाटील,मिलिंद पाटील,अनिलशेठ म्हात्रे,अमृत म्हात्रे यांनी अभिनंद केले. राजेश मोकल यांच्या विजयात संजय जांभळे यांचे मोलाचे योगदान आहे. हा विजय माझा नसून जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाचा  विजय असून सरपंच राजेश मोकल यांनी सर्व मतदार,कार्यकर्ते,सहकारी तसेच नातेवाईक या सर्वांचे मनापासून आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...