आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

डॉ नातू महाविद्यालयामध्ये भरारी वार्षिक अंकाचे प्रकाशन

मार्ग ताम्हाणे:  येथील डॉ तात्यासाहेब नातू कला व वाणिज्य महाविद्यालय वतीने प्रतिवर्षी भरारी वार्षिक अंकाचे प्रकाशन केले जाते. या वर्षी देखील प्रकाशन समारंभ  आयोजित केला होता. चिपळूण परिसरातील लेखक. पर्यटन व पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांच्या हस्ते भरारी चे प्रकाशन करण्यात आले त्या प्रसंगी बोलताना धीरज वाटेकर यांनी कोरोना परिस्थितीत देखील महाविद्यालयाने आपली परंपरा सुरू ठेवून साहित्य सेवा केली असल्या बद्दल समाधान व्यक्त केले. सर्वांनी आपल्या अनुभवाचे लेखन केले तर आपल्या व इतरांच्या जीवनाला दिशा मिळण्याचे काम होते स्वतःला आनंद मिळतो असे मत व्यक्त केले. प्रारंभी प्रा राजश्री कदम यांनी संपादक म्हणून आलेले अनुभव सांगितले करोना काळातील आपले अनुभव लिहिणे लिहून घेणे व प्रकाशित करणे हे काम आव्हानात्मक असले तरीही सर्वांनी मिळून केले असल्याने शक्य झाले असल्याचे मत व्यक्त केले. मार्ग ताम्हाणे एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष श्री जयसिंगराव मोरे यांनी आपले मत व्यक्त करताना लिखाणाचे महत्त्व विशद केले आपल्या मनातील विचार भावना लिहून ठेवल्यास नंतर वाचन केले तर सुखद अनुभव येतात या साठी वाचन करावे असे आवाहन केले प्राचार्य विजयकुमार खोत. कृष्णकांत चव्हाण यांनी देखील आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राजश्री कदम यांनी केले तर उपस्थितांचे  आभार प्रा डॉ सुरेश सुतार यांनी मानले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...