आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

झोपी गेलेले नगरसेवक जागे झालेत.. पाच वर्षात काहीच कमी न करणाऱ्यांची लगबग सुरू

 किशोर गावडे, भांडुप : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.कामे मंजूर करण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनवण्या करीत साहेब, निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आपल्या कामाची निविदा काढा साहेब,म्हणजे लगेच कामाला सुरुवात करता येईल. आपण केलेल्या कामांची यादी काढून ठेवा .अशी लगबग सध्या सर्व प्रभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात सुरू आहे .त्यासाठी महापालिका क्षेत्रीय कार्यालयात नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फेर्‍या सुरू झालेल्या आहेत .काही ठिकाणी तर मागील तीन वर्षापासून केवळ इतरांच्या उद्घाटनाला दिसणारे लोकप्रतिनिधी यावर्षी प्रभागात विकासकामांची गंगा वाहणार आहे ,अशा अविर्भावात फिरत आहेत .

    २०१७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या .त्यामध्ये काही लाटेवर तर काही विकासकामांच्या जोरावर नगरसेवक झालेत.मात्र ,त्यानंतर विकास कामांच्या जोरावर आलेल्या नगरसेवकांनी सेवका प्रमाणे कामाला सुरुवात केली .मात्र, काही नगरसेवक केवळ उद्घाटने सर्वसाधारण सभा आणि बडेजाव करण्यातच दंग झाले पाहिले.

    आश्चर्य म्हणजे काहींना तीन वर्षे कसे गेले हे कळलेच नाहीत. त्यात मार्च २०२० मध्ये कोरोना संसर्ग सुरू झाला. आणि वर्ष झपाट्यात संपले. आता बारा महिन्यात २०२२ मध्ये पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत केलेल्या विकास कामांची यादी तयार करण्यात लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झालीय. 

      आता मतभेद आणि श्रेयवाद एखादा प्रश्न सोडविताना नगरसेवकांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे.याचा प्रत्यय मागील पंधरा दिवसात अनेक घटनांतून समोर आला. एवढेच नव्हे तर तत्कालीन नगरसेवकांनी प्रस्तावित केलेल्या विकास कामांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता ते काम मार्गी लावून श्रेय घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे .काहीनी तर बोटांवर मोजता येईल एवढीच विकासकामे केली. मात्र ,भली मोठी यादी प्रसिद्धी केली. त्यामुळे आपापसातील मतभेद वाढू लागले असून समोरचे श्रेय घेण्याआधी त्यांची उद्घाटन आणि प्रसिद्धी करून घेण्याची धडपड लोकप्रतिनिधींची सुरू झाली आहे.

    काम एकाचे श्रेय घेतात सगळे संपूर्ण पाच वर्ष आपली आहेत असे म्हणून सत्कार उद्घाटन मध्ये व्यस्त असलेल्या काही नगरसेवकांना आता आपण काही कामे केली नसल्याचे लक्षात आले आहे .मात्र प्रभागात एखाद्या नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय अन्य नगरसेवक घेत असल्याचे दिसून येते. कारण बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या विकास कामाचे अहवाल प्रसिद्ध केला त्यामध्ये दोन ते तीन नगरसेवकांच्या अहवालांमध्ये एकाच विकास कामांचा उल्लेख दिसून आला. त्‍यामुळे काम एका चे तर श्रेय सगळ्यांचे  अशी गत झाली आहे.धूळ खात पडलेल्या वचननाम्यातील धूळ उडाली विकास कामे केली नाही तर जनतेला काय उत्तर द्यायचे. मागील निवडणुकीत आपल्या वचननाम्या मध्ये कोणती कमी करू असे जनतेला सांगितले त्यातील किती कमी मार्गे लागली आणि किती राहिली त्यासाठी मागील चार वर्षापासून धूळ खात पडलेल्या त्या वचननाम्यात वरील धूळ आता उडाली. मात्र कामांची यादी पाहून लोकप्रतिनिधीने गडबडले असून ही कामे कधी करायची? या विचाराने महापालिका आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना साहेब तुम्हीच आमचे तारणार तुमच्याशिवाय काम होणार का? अशी विशेषणे वापरून तेवढे आपल्या कामाचं बघा! अशी कुजबूज महापालिका क्षेत्रातील कार्यालयात  केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...