आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

पाते पिलवली गावचा सुपुत्र कु.सुरज मांडवकर "सरस्वती पुरस्काराने" सन्मानित !

चिपळूण : ( दिपक कारकर )चिपळूण तालुक्यातील कुणबी शिक्षण मंडळ,चिपळूण संचलित न्यू इंग्लिश स्कूल,कळंबट या विद्यालयातर्फे एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत विद्यालायतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विदयार्थ्यास "सरस्वती पुरस्कार" या विद्यालयाच्या मानाच्या पुरस्काराने प्रतिवर्ष गौरविण्यात येते.गेली ४ वर्षे या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. विदयार्थ्यांना प्रेरणादायी असा हा उपक्रम आहे.नुकताच हा पुरस्कार सोहळा आज दि.२६ जानेवारी २०२१ भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून विद्यालयाच्या झेंडा वंदन कार्यक्रम प्रसंगी देण्यात आला.या पुरस्काराचा मानकरी ठरला तो सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी. बोर्ड परीक्षेत विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला पाते पिलवली ( विठ्ठलवाडी ) येथील सुपुत्र कु. सुरज तुकाराम मांडवकर होय.शालेय उपक्रमात नेहमीच अग्रेसर व अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या सुरजने अतिशय गरीबीतून आपल्या कौटुंबिक परिस्थितीचा सामना करून हे यश मिळवलं आहे.सुरज पुढील शिक्षण कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे कनिष्ठ महाविद्यालय,मांडकी-पालवण येथे इयत्ता ११ वी. ( वाणिज्य ) शाखेतून घेत आहे.

   आजच्या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एल.बी.डांगे सर,पुरस्काराचे सौजन्य श्री सखाराम कोकमकर,विद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी गावचे ग्रामस्थ व विदयार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.सरस्वती पुरस्काराचा मानकरी सुरज मांडवकर यांस सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक श्री पांडे सर यांनी केले.सुरजच्या या उत्तुंग यशाबद्दल व विद्यालयाच्या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...