आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

लसीकरणासाठी नोंदणी महत्त्वपूर्ण ! मात्र नागरिकांनी सायबर जाळ्यात फसू नका : वपोनी शाम शिंदे -भांडुप पोलीस ठाणे यांचे आवाहन

 भांडुप-किशोर गावडे : कोरोनाच्या लसीकरणाला मुंबईत प्रारंभ झालेला आहे .पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना  लस देण्यात येत आहे .पुढे काही दिवसानंतर ती सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येईल. त्याचे योग्य पद्धतीने वरिष्ठ पातळीवर  नियोजन सुरू आहे. मात्र लसीकरणासाठी नोंदणीही आवश्यकच आहे. नोंदणी करताना नागरिकांनी सायबर जाळ्यात अडकू नये, असे आवाहन  भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांनी केले आहे.

  गेल्या काही वर्षात सायबर गुन्हेगारांकडून अनेकांना ऑनलाइन गंडा घातला जात आहे. कर्ज  मंजूर झाल्याचे आमिष दाखवून किंवा एटीएम ब्लॉक झाल्याची  थाप मारून नागरिकांना गंडावून  त्यांचे लाखो रुपये  सायबर भामट्यांनी लंपास केले आहेत. त्यासाठी बनावट कस्टमर केअर सर्विस नंबरही तयार केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे .कोरोना लसीकरण  ही  सायबर भामट्यांसाठी लूट करण्याची संधी असू शकते .नोंदणी प्रक्रियेत ते सर्वसामान्यांना गंडा घालू शकतात.फोन किंवा मेसेज पाठवून शासकीय एजन्सीचे कर्मचारी असल्याचा बनाव रचून लवकरच   लस उपलब्ध होणार आहे, अशी थाप मारत आधार कार्ड, किंवा आपल्या बॅक खात्याचा तपशील मागून आॅनलाईन फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. बनावट पोर्टल तयार करून कोरोनाची लस होम डिलिव्हरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होण्याची शक्यता आहे.तसेच कॅशबॅक डिस्काउंट आॅफर देऊन  फसवणूक होऊ नये, यासाठी सजगता बाळगा. सावध रहा. सतर्क रहा. गोड आवाजात बिलकुल  फसू नका. काळजी घ्या. असे आवाहन भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...